Marathi News> टेक
Advertisement

ऑडीची पहिली इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज केल्यावर चालणार ५०० किमी

लग्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑडी कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई-ट्रॉन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचं प्रोडक्शन मॉडल ३० ऑगस्ट २०१८ रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.

ऑडीची पहिली इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज केल्यावर चालणार ५०० किमी

नवी दिल्ली : लग्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑडी कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई-ट्रॉन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचं प्रोडक्शन मॉडल ३० ऑगस्ट २०१८ रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.

जर्मनीत कारची किंमत

कंपनीने याचं कॉन्सेप्ट मॉडल २०१८ जिनेवा मोटर शोमध्ये सादर केलं होतं. जर्मन कार निर्माता कंपनीने घोषणा केली आहे की, जर्मनीत याची किंमत ८०,००० यूरो (जवळपास ६४.०८ लाख रुपये) पासुन सुरु होणार आहे.

लवकरच भारतीय बाजारपेठेत

ऑडी कंपनीने ई-ट्रॉन इलेक्ट्रिक एसयूव्ही युरोपियन बाजारात २०१८च्या शेवटपर्यंत लॉन्च करणार आहे. त्यानंतर २०१९ पर्यंत इतर बाजारात लॉन्च करण्यात येईल. ही कार भारतीय बाजारपेठेत लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, ऑडीने भारतात ई-ट्रॉनचं ट्रेडमार्क यापूर्वीच रजिस्टर्ड केलं आहे.

भारतात कारची किंमत १ कोटींहून अधिक

भारतात ही कार CBU रुटच्या माध्यमातून लॉन्च करण्यात येणार आहे त्यामुळे या कारची किंमत दुप्पट होण्याची शक्यता आहे. सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)च्या मते, सर्व गाड्यांवर आयात शुल्क त्याच्या किमतीच्या १०० टक्के लावण्यात येणार आहे. त्यामुळे या कारची किंमत १.३ कोटी रुपयांच्या घरात पोहचणार आहे.

एकदा चार्ज झाल्यावर ५०० किमी चालणार

ऑडी ई-ट्रॉन मध्ये ९५ kWh ची बॅटरी देण्यात येणार आहे. ही बॅटरी 435 ps ची पावर आणि ८००Nm चा टॉर्क जनरेट करेल. ही कार ० ते १०० किमीचा स्पीड पकडण्यासाठी केवळ ४.६ सेकंदांचा वेळ घेते. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही कार ५०० किमीपर्यंत चालू शकते. या कारचा टॉप स्पीड २१०kmph आहे.

Read More