7 Seater Car in Budget Range: सणासुदीच्या या दिवसांमध्ये कुटुंबाला एखादा आश्चर्याचा धक्का द्यायच्या विचारात असाल तर एक उत्तम पर्याय तुमच्या प्रतीक्षेत आहे. हा पर्याय आहे एका अफलातून फॅमिली कारचा. हल्ली कार खरेदीचा पर्याय विचारात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या किमान थेट कुटुंबाला तरी एकत्र सामावून घेईल अशीच कार हवी याचसाठी सर्व मंडळी आग्रही असल्याचं पाहायला मिळतं. या सर्व हिशोबात पैशांचा मुद्दा डोकं वर काढतो आणि तिथं मात्र या स्वप्नाला वेसण घातलं जातं.
इथून पुढं मात्र असं होताना दिसणार नाहीय. कारण, सध्या बहुतांश कार कंपन्या सामान्यांच्या गरजा आणि त्यांची खर्च करण्याची आवक पाहता त्याच अनुषंगानं कार डिझाईन करत आहेत. त्यातलाच एक उत्तम, 7 जणांची आसनक्षमता असणारा पर्याय म्हणजे रेनॉ ट्रायबर.
1.0 लीटरचं 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारमधून 96एनएमचा टॉर्क आणि 72 पीएसची मॅक्सिमम पॉवर जनरेट होते. ज्यामुळं ही कार प्रति लीटर 18.29 ते 19 किमी इतकं मायलेज देते. 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक एएमटी असे दोन पर्याय या कारमध्ये दिले जातात. कारमध्ये सर्व बेसिक इंटेरिअर असून यामध्ये 20.32 सेंटीमीटरची टचस्क्रीन इंफोटेन्मेंच सिस्टीम, स्टीअरिंग माऊंटेड ऑडिओ, फोन कंट्रो, एलईडी, इंस्ट्रूमेंट क्सस्टर, स्मार्ट अॅक्सेस कार्ड, पुश स्टार्ट-स्टॉप बटन, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलँप, अॅडजस्टेबल ड्रायवर सीट, कूल्ड स्टोरेज, 182 mm चं हाय ग्राऊंड क्लिअरन्स अशा फिचरसह ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.
4 एअरबॅग (दोन पुढे आणि 2 बाजूला) असल्यानं या कारला ग्लोबल एनकॅपनं प्रौढांच्या हिशोबानं 4 स्टार सेफ्टी रेटिंग दिलं आहे. तर, लहान मुलांच्या दृष्टीकोनातून 3 स्टार रेटिंगसह ही कार अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
रेनो ट्रायबर कारची किंमत 6.09 रुपयांपासून सुरू होऊन या कारच्या टॉप मॉडेलसाठी 8.97 लाख रुपये मोजावे लागतात. ही कार ज्या सेग्मेंटमध्ये विकली जात आहे त्या एमपीव्ही सेग्मेंटमध्ये मारुति अर्टिगाचं वर्चस्व असलं तरीही किमतीच्या तुलनेत रेनॉची ट्रायबर सरशी करताना दिसते. अर्थात परफॉर्मन्सच्या बाबतीत अर्टिगा आघाडीवर असली तरीही जी किंमत या कारसाठी मोजली जात आहे त्या हिशोबानं ही 'बेस्ट डील' आहे असं म्हणणं गैर नाही.