Mahindra Scorpio N Base Model: भारतीय (Auto News) ऑटो क्षेत्रामध्ये गेल्या कैक वर्षांपासून वर्चस्व असणाऱ्या आणि ग्राहकांची विश्वासार्हता जिंकणाऱ्या (Mahindra Cars) महिंद्रानं पुन्हा एकदा नाही म्हणता अर्ध्या देशाचं मन जिंकलच आहे. खिशाला फार ढील न देता जर महिंद्राची स्कॉर्पियो ही कार खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तर चर्चेच असणारं हे व्हेरिएंट एक उत्तम पर्याय आहे.
किमान फिचर्स असूनही कमाल रोड प्रेझेंस असणारी ही कार आहे (Mahindra Scorpio N Base Model) महिंद्रा स्कॉर्पियो एन. या कारचं बेस मॉडल Z2 (पेट्रोल) अवघ्या 13.99 लाख रुपयांच्या बजेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळं महिंद्राचीच कार खरेदी करायच्या विचारात असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय.
Z2 मॉडेलला 2.0L mHawk टर्बो-पेट्रोल इंजिन असून, त्यातून 5000 RPM वर 149.14 kW ची मॅक्सिमम पॉवर आणि 1750-3000 RPM वर 370 Nm पीक इतकं टॉर्क जनरेट करता येतं. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जातो.
या कारच्या एक्सटेरिअरमध्ये LED हेडलँप्स, LED डे-टाइम रनिंग लाइट्स (DRLs), डे-टाइम रनिंग लाइट्स (DRLs), ब्लॅक फ्रंट आणि रिअर बंपर, रिअर स्पॉयलरचा समावेश आहे. तर, इंटेरिअरमध्ये ब्लॅक फ्रॉब्रिक सीट्स, मॅन्युअल एयर कंडीशनिंग, 4-स्पीकर ऑडियो सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक विंडो, ड्युअल एअरबॅग, सेंट्रल लॉकिंग, ABS with EBD, रिअर पार्किंग सेंसरचा समावेश आहे.
कारच्या या बेस मॉडेलमध्ये इंजिनमध्ये पर्याय उपलब्ध नसून, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, सनरुफ आणि क्रूज कंट्रोल असे फिचर नाही आहेत. असं असलं तरीही एसयूव्ही म्हणून मिड रेंजमध्ये महिंद्राच्या या कारचा विचार करणं एक फायद्याचा पर्याय ठरु शकतो.