Marathi News> टेक
Advertisement

Royal Enfield धुमाकूळ घालणार! नव्या लूकमध्ये लाँच केली Guerrilla 450, किंमत फक्त...

Royal Enfield Guerrilla 450: अगदी बरोबर... ही Royal Enfield चीच बाईक आहे; किंमत फक्त... पाहा तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार का ही बाईक....  

Royal Enfield धुमाकूळ घालणार! नव्या लूकमध्ये लाँच केली Guerrilla 450, किंमत फक्त...

Royal Enfield Guerrilla 450: ऑटो क्षेत्रावर कैक वर्षांपासून दबदबा असणाऱ्या रॉयल एनफिल्डनं आता पुन्हा एकदा बाईकप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करत कंपनीची Guerrilla 450 ही बाईक एका नव्या रुपात सादर केली आहे. तरुणाईमध्ये या बाईकचं असणारं वेड पाहता त्यांच्याच पसंतीस उतरणाऱ्या अंदाजात ही बाईक कंपनीनं सादर केली आहे. 

दमदार परफॉर्मन्स, समाधानकारक मायलेज, कोणत्याही बाईकप्रेमीच्या पसंतीस पडतील असे फिचर या साऱ्याचा सारासार विचार करत बाईक तयार करणाऱ्या एनफिल्डनं गुरिल्ला 450 ही नव्या रुपातील बाईक आता ब्राँझ रंगात सादर केली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत आहे, 2 लाख 49 रुपये. बाईकला नवा लूक देण्यासाठी Peix Bronze हा रंग निवडण्यात आला आहे. जिच्या डॅश व्हेरिएंटमध्ये स्मोक सिल्व्हर रंगसुद्धा पाहायला मिळणार आहे. ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणं डॅश व्हेरिएंटला हा रंग देण्यात आला आहे. 

सध्या ही बाईक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून तिच्या किमती आणि फिचर वेगवेगळे आहेत. बाईकच्या Analogue वेरिएंटमध्ये बेसिक फिचर आणि सिल्वर स्मोक रंग देण्यात आले आहेत. ज्यासाठी 2 लाख 39 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागते. बाईकचं डॅश वेरिएंट 2 लाख 49 हजार रुपयांना असून यामध्ये डिजिटल डिस्प्लेसह स्मोक सिल्वर आणि Peix Bronze असे रंग उपलब्ध आहेत. 

हेसुद्धा वाचा : कितीही गर्दी असो, 'ही' एक ट्रीक वापरून रेल्वेत मिळवा 10 मिनिटात कन्फर्म तिकीट 

बाईकचा रंग बदलला असला तरीही मॅकेनिकल स्पेसिफिकेशनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. थोडक्यात या बाईकमध्ये तुम्हाला शेरपा 450 इंजिन मिळणं सुरूच राहणार असून, ही बाईक हिमालयन 450 पेक्षाही अधिक चांगलं परफॉर्म करते. ही बाईक 452 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल इंजिनसह विक्रीसाठी उपलब्ध असून, बाईकचं इंजिन 8000 आरपीएमसह 39.52 बीएचपी पॉवर जनरेट करतं. तर, 5500 आरपीएमसह 40 एनएम इतका टॉर्क जनरेट करतं. 

Read More