Marathi News> टेक
Advertisement

TATA म्हणजे विश्वास! सगळ्या बहाद्दरांवर मात करच 'या' कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती, फॅमिलीसाठी उत्तम पर्याय

Auto News : नावापुढे TATA लागलं की कारची सुस्साट विक्री झालीच समजा... तुमच्याही कुटुंबाला आवडेल ही कार. किंमतही 7 लाखांच्या आत...  

TATA म्हणजे विश्वास! सगळ्या बहाद्दरांवर मात करच 'या' कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती, फॅमिलीसाठी उत्तम पर्याय

Auto News : भारतात सध्याच्या घडीला ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या सक्रिय असून, भारतीय ग्राहकांची वाहन चालन शैली, क्षमता आणि भारतीय रस्त्यांसमवेत ग्राहकांच्या आर्थिक नियोजनाची काळजी घेत कारचे एकाहून एक सरस मॉडेल बाजारात विक्रीसाठी आणतात. टाटा मोटर्सही यात मागे नाही. टाटाच्या अनेक कारला भारतीय ग्राहकांनी जणू कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणं वागणूक दिली. त्यात सध्या सर्वाधिक मागणी असणाऱ्या एका मॉडेलचाही समावेश आहे. 

TATA ची सर्वाधिक पसंतीची कार कोणती? 

यंदाच्या वर्षात टाटा पंच टाटाच्या सर्वाधिक पसंतीच्या कारपैकी एक आहे. अवघ्या चार वर्षांमध्ये या खिशाला परवडणाऱ्या दरात मिळणाऱ्या कारचे 6 लाख युनिट तयार करत त्यांची विक्री करत कंपनीनं एक मैलाचा दगड गाठला आहे. 2021 मध्ये एसयुव्ही टाटा कंपनीकडून ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच करण्यात आली होती. तेव्हापासूनच या कारनं विक्रीचे अनेक विक्रम मोडित काढले. 2024 मध्येसुद्धा ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. 

किमतीच्या बाबतीतही सामान्यांच्या मनावर राज्य करतेय ही कार... 

Tata Motors च्या माहितीनुसार ही कार देशभरातील विविध श्रेणीतील ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, प्रामुख्यानं ती मध्यमवर्गीयांच्या मनावर राज्य करत आहे. भारतीय बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 6.19 लाख रुपये इतकी आहे. ज्यामध्ये 1.2 लीटरचं रेवोट्रॉन इंडिन असून, त्यातून 6,700 rpm वर 87.8 PS इतकी पॉवर जनरेट होते. तर, 3,150 ते 3,350 rpm पर्यंत 115 Nm टॉर्क जनरेट होतो. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्झिशन मिळत असून, कारच्या टॉप मॉडेल व्हेरिएंटमध्ये ट्रान्समिशन ऑप्शनही उपलब्ध आहे. 

टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनसह ARAI  मायलेज 20.09 kmpl इतकं असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ती 18.8 kmpl  इतकं मायलेज देते असा दावा कंपनीकडून करण्यात येतो. या कारचे फिचर्स आणि तिची किंमत या खऱ्या अर्थानं जमेच्या बाजू आहेत. 

या कारमध्ये इलेक्ट्रीक सनरुफ, 26.03 सेंटीमीटकचं टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात येतं. शिवाय फोन चार्ज करण्यासाठी कारमध्ये वायरलेस चार्जिंगचंही फिचर आहे. भरीस भर म्हणजे या कारला ग्लोबल एनसीपीच्या वतीनं 5 स्टार सेफ्टी रेटींग मिळाल्यानं ती किफायतशीर दरात मिळणारी एक उत्तम फॅमिली कार ठरत आहे. 5 जणांच्या कुटुंबासाठी पंच एक उत्तम पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Read More