Top Scooters Under 1 Lakh: भारतात ज्याप्रमाणे काही बाईकना गावखेड्यापासून ते अगदी शहरांपर्यंत सामान्यांकडून कमाल पसंती मिळते आणि प्रवास या बाईकमुळं सोपा होऊन जातो; अगदी त्याचप्रमाणे स्कूटरनासुद्धा प्राधान्य दिलं जातं. महिला बाईकस्वार असो किंवा पुरूष, स्कूटर हे अनेकांसाठीच प्रवासाचं अतिशय कम्फर्टेबल साधन.
बाईकच्या तुलनेत वजनानं काहीशा कमी तरीही तितक्याच भक्कम आणि कार्यक्षम असा या स्कूटर प्रवास सुकर करण्यासोबतच सामान वाहण्यापर्यंतच्या कामांसाठीसुद्धा वापरल्य़ा जातात. त्यामुळं चांगला लेग स्पेस, कमाल संतुलन आणि कम्फर्टेबल सीट अशा निकषांना पूर्ण करणाऱ्या स्कूटर खरेदीला अनेक मंडळी प्राधान्य देतात. अशाच काही दमदार स्कूटरचे पर्याय इथं देण्यात आले असून, महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची किंमतसुद्धा खिशावर फारसा ताण टाकणार नाही याची खात्री घेण्यात आली आहे. पाहा अशाच स्कूटरचे पर्याय...
Honda Activa 6G ची ऑन रोड किंमत 92,181 ते 98,731 रुपयांदरम्यान असून, ती 109.51cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे. प्रति लीटर 59.5 किमी इतकं मायलेज देणारी ही स्कूटर 85 kmph इतका टॉप स्पीड देते. आतापर्यंत भारतात सर्वाधिक खप होणारं होंडाचं विश्वासार्ह मॉडेल अशी या स्कूटरची ओळख.
1 लाख रुपयांपासून मिळणारी Suzuki Access स्कूटर 124cc इंजिनसह 8.42 PS इतकी पॉवर जनरेट करते. तर, 45 kmpl इतकं मायलेज देते. जास्त पॉवर आणि चांगल्या परफॉर्मन्सच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय आहे.
Yamaha Fascino 125 Fi Hybrid ची ऑनरोड किंमत 99,969 रुपये असून ही स्कूटर 125cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे. 68.75 kmpl चं मायलेज देणाऱ्या या स्कूटरचा टॉप स्पीड आहे 90 kmph. तरुणाईची रायडिंग स्टाईल लक्षात घेत ही स्कूटर डिझाईन करण्यात आली आहे. 1 लाखांच्या बेस बजेटमध्ये ही स्कूटर पैसा वसूल पर्याय ठरते.
88,561 रुपयांपासून पुढच्या दरात उपलब्ध असणारी TVS Jupiter 1.06 लाखांपर्यंतच्या सर्वाधिक दरात विकली जाते. 113.3cc चं इंजिन असणारी ही स्कूटर 48 kmpl इतकं मायलेज देते. 82 kmph या स्कूटरचा टॉप स्पीड असून, मजबूत पकड, स्मूद रायडिंग आणि उत्तम ग्राऊंड क्लिअरन्ससाठी ही स्कूटर अनेकांनाच भावते.