Best CNG Cars: भारतीय Auto Sector मध्ये दर दिवशी काही नवे आणि सकारात्मक बदल होत असताना पेट्रोल आणि डिझेल कारचे सातत्यानं वाढणारे दर मात्र चिंतेत भर टाकत आहेत. ज्या मंडळींना कार खरेदीचा बेत आखायचा आहे, त्यांनी या वाढीव खर्चाच्याच भीतीनं आपला कार खरेदीचा निर्णय आवरता घेतला आहे. आता मात्र या मंडळींना कारसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण एक चांगली Saving एक चांगली कारही मिळवून देऊ शकते. शिवाय इंधनाची चिंताही नाही, कारण या कार आहेत CNG Car.
टाटा पंच ही कार पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध दिसेल. पंच iCNG आइकॉनिक ALFA आर्किटेक्चरवर आधारित असून, ही कार तिच्या सेफ्टी फिचरसाठी ओळखली जाते. या कारमध्ये iCNG सुद्धा देण्यात आलं आहे, जे कोणत्याही प्रकारच्या वायूगळतीपासून कारचा बचाव करतं. कारमध्ये दुर्दैवानं वायूगळती झालीच तर ती आपोआपच पेट्रोल मोडवर स्विच होते.
भारतीय कार क्षेत्रामध्ये किफायतशीर दराक उपलब्ध असणारी कार म्हणजे ऑल्टो K10ऑल्टो K10 1.0-लीटर पेट्रोल इंजिन सीएनजी मोडमध्ये 56 एचपी पॉवर आणि 82.1 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळत असून ही कार 33.85 किमी/ किलोग्राम मायलेज देते.
हल्ली मारुतीनं त्यांची स्विफ्ट ही कारसुद्धा सीएनजी व्हेरिएंटमध्ये सादर केली. या कारमध्ये Z-सीरीज इंजिन आणि S-CNG कॉम्बिनेशन देण्यात आलं असून, त्यातून 32.85 km/kg इतकं मायलेज मिळतं. सध्या ही कार तीन व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. मारुती स्विफ्टमध्ये स्मार्टप्ले प्रो 17.78 सेंटीमीटर टचस्क्रीन, USB आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी यहे फिचर देण्यात आले आहेत. 10 लाखांहून कमी किमतीत ही कार खरेदी करता येते. त्यामुळं वाढत्या दराच्या या दिवसांमध्ये सीएनजी कारमध्ये वरील पर्यायांचा विचार करण्यास हरकत नाही.