Marathi News> टेक
Advertisement

घरी वाय-फाय असेल तर कोणता रिचार्ज प्लॅन फायद्याचा? Jio, Airtel, Vi किंवा BSNL मधील बेस्ट ऑफर!

Best recharge Plan:  या प्लानमध्ये तुम्हाला डेटाशिवाय अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळेल. 

 घरी वाय-फाय असेल तर कोणता रिचार्ज प्लॅन फायद्याचा? Jio, Airtel, Vi किंवा BSNL मधील बेस्ट ऑफर!

Best recharge Plan: आजकाल इंटरनेट लोकांसाठी एक गरज बनली आहे. आजच्या काळात बहुतेक लोक त्यांचा अर्धा दिवस इंटरनेट वापरण्यात घालवतात. अनेकांनी त्यांच्या घरात वाय-फाय बसवले पाहायला मिळतं. ज्यामुळे त्यांना अनलिमिटेड आणि फास्ट इंटरनेट वापरता येते. जर तुमच्या घरातही वाय-फाय असेल आणि तुम्ही परवडणारा रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कारण या प्लानमध्ये तुम्हाला डेटाशिवाय अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळेल. Jio, Airtel आणि Vi, BSNL च्या विविध रिचार्ज प्लॅनमधील तुमच्या फायद्याचा प्लॅन कोणता? याबद्दल जाणून घेऊया. 

Jio चा 1748 रुपयांचा प्लॅन

Jio चा 1748 रुपयांच्या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वॅलिडीटी मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमटेड मोफत कॉलिंग आणि एकूण 3600 मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

एअरटेलचा 1849 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा 1849 रुपयांचा प्लॅनमध्ये पूर्ण 365 दिवसांची वॅलिडीटी मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मोफत कॉलिंग आणि एकूण 3600 मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, अपोलो 24/7 सर्कल आणि मोफत हॅलोट्यूनचा फायदा देखील मिळेल.

VI चा 1849 रुपयांचा प्लॅन

VI चा 1849 रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्ण 365 दिवसांची वॅलिडीटी मिळते.  या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मोफत कॉलिंग आणि एकूण 3600 मोफत एसएमएसचा फायदा मिळेल.

BSNL चा 1199 रुपयांचा प्लॅन

BSNL चा 1199 रुपयांचा प्लॅन देखील पूर्ण 365 दिवसांच्या वॅलिडीटीसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा फायदा मिळेल. यासोबतच तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24 जीबी डेटाचा फायदा देखील मिळतो.

Read More