Marathi News> टेक
Advertisement

Amazon- Flipkart धमाकेदार Sale; पैसे वाचवत Shopping करण्याची ही संधी गमावू नका

 यामध्ये तुम्हाला आयफोनवर सर्वात जास्त डिस्कॉउंट दिलं जात आहे.

Amazon- Flipkart धमाकेदार Sale; पैसे वाचवत Shopping करण्याची ही संधी गमावू नका

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंञ्य दिन जवळ येतोय अशावेळी दरवर्षी प्रमाणे ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट घेऊन आलेत तुमच्यासाठी बंपर ऑफर्स आणि सेल.. या सेलमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना 71 टक्के इतकी मोठी सूट देणार आहेत अ‍ॅमेझॉन कडून द ग्रेट इंडियन सेल  9 ऑगस्ट पासुन सुरु होईल आणि 12 ऑगस्ट पर्यंत हा सेल चालेल त्याचसोबत फ्लिपकार्ट कडून द बिग फ्रिडम सेल सुद्धा 9 ऑगस्ट पासून सुरु होईल आणि 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे  

अ‍ॅमेझॉन काय खास ऑफर देणार आहे 
 
'अ‍ॅमेझॉन द ग्रेट इंडियन सेल'यामध्ये  यावेळी स्मार्टफोन आणि ऍक्सेसिरीजवर 40 टक्क्यांची घसघशीत सूट असणार आहे तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 50 टक्क्यांची सूट असेल त्यासोबत जर तुम्ही एसबीआय च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करणार असाल तर तुम्हाला 15 टक्के आणखी डिस्कॉउंट मिळू शकणार आहे त्याचसोबत  अ‍ॅमेझॉन पे वरून बुकिंग केलेत तर आणखी 15 टक्के डिस्कॉउंट तुम्ही मिळवू शकता . यामध्ये तुम्हाला आयफोन  IPhone5S,6,6S,7,7S वर सर्वात जास्त डिस्कॉउंट दिलं जात आहे. सॅमसंग आणि वन प्लस या स्मार्टफोनवर 2000 रुपयांचं डिस्कॉउंट दिलं जाणार आहे याशिवाय हेडफोन आणि इतर एक्सएसरीज वर 40 टक्क्यांपेक्षा जास्त डिस्कॉउंट तुम्हाला मिळू शकतं 
  

फ्लिपकार्ट काय ऑफर्स देत आहे.

फ्लिपकार्ट च्या 'द बिग फ्रिडम सेल' वर कंपनी काही प्रोडक्टवर 71 टक्क्यांची सूट देत आहे या सेल मध्ये रेडमी Redmi Note4 वर 1000 रुपयांचा डिस्कॉउंट मिळत आहे .फ्लिपकार्ट यावेळी जर तुम्ही एचडीएफसी (hdfc)डेबिट किंवा क्रेडिट कार्डने बुकिंग केलत तर आणखी 10 टक्के डिस्कॉउंट मिळणार आहे . या सेलमध्ये  गूगल पिक्सेल एल वर 18 हजारांचा डिस्कॉउंट दिला जात आहे त्यांनतर हा फोन तुम्हाला 48 हजार 999 रुपयांना मिळू शकणार आहे त्याच्याशिवाय फ्लिपकार्ट आणखी इतर स्मार्ट फोन्सवर 1000 रुपयांपर्यंत डिस्कॉउंट देत आहे. 

Read More