Marathi News> टेक
Advertisement

मुंबईचा आयकॉन मासा 'बॉम्बे डक' - बोंबिल

बोंबिल ओला म्हणजेच ताजा असतानाही बनवून खातात आणि सुकवूनही बोंबिल खातात.

मुंबईचा आयकॉन मासा 'बॉम्बे डक' - बोंबिल

मुंबई : बोंबिल मासा याला बॉम्बे डक, लिझार्ड फीश, बुमलो, बुम्बलो देखील म्हणतात. बोंबिल ओला म्हणजेच ताजा असतानाही बनवून खातात आणि सुकवूनही बोंबिल खातात. बोंबिल करी सर्वांची आवडती असते. मुंबईत तुम्हाला अनेक ठिकाणी माशांचा वास येतो, तो जास्तच जास्त वेळेस बोंबिलचाच असतो.

बोंबिल माशाला वेगवेगळ्या नावांप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे नाव आहे. अगदी इंग्रजांच्या काळापासून बोंबिल मासा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. मुंबईकरांचं आवडतं खाद्य म्हणूनही बोंबिल मासा ओळखला जातो.

मुंबईसोडून महाराष्ट्रात कोरडे बोंबिल खाण्यासाठी वापरले जातात. सुके बोंबिल आणि बोंबिल करी मस्य प्रेमींसाठी आवडतं खाद्य आहे. हा मासा मुंबई शिवाय पश्चिम बंगाल आणि ओरिसाला लागून असलेल्या समुद्रात आढळतो.

Read More