Marathi News> टेक
Advertisement

'ही' कंपनी देत आहे १ रुपयात अनलिमिडेट डेटा!

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवे प्लॅन्स सादर करत आहेत.

'ही' कंपनी देत आहे १ रुपयात अनलिमिडेट डेटा!

नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवे प्लॅन्स सादर करत आहेत. तर कधी प्लॅन्समध्ये बदल करुन ते सादर केले जात आहेत. या प्लॅन्समधून १ जीबी ते ५ जीबीपर्यंतचा डेटा रोज मिळत आहे. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की, तुम्हाला जर १ रुपयात अनलिमिटेड डेटा मिळत असेल तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरे आहे.

ही कंपनी देत आहे सुविधा

भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तुम्हाला ही सुविधा देणार आहे. बीएसएनएल युजर्स १ रुपयात अनलिमिटेड डेटा देत आहे. यासाठी बीएसएनएलने डेटाविंडसोबत करार केला आहे. स्मार्टफोन आणि टॅबलेट निर्माता कंपनी डेटाविंडसोबत मिळून बीएसएनएल युजर्सला ही जबरदस्त ऑफर देत आहे.

लवकरच मिळेल ही सेवा

डेटाविंड आणि बीएसएनएलसोबत झालेल्या करारामध्ये युजर्सला ही सेवा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात मिळण्यास सुरूवात होईल. या सुविधेसाठी डेटाविंडचा पेंटेंट अॅप मेरानेट चा वापर केला जाईल. अॅप अॅनरॉईड स्मार्टफोन आणि जावा फिचर फोनवर काम करेल.

सुविधा मिळवण्यासाठी हे करा

१ रुपयातील अनलिमिटेड डेटासाठी युजर्संना बीएसएनएलचे सीम खरेदी करावे लागेल. यानंतर युजर्सना आपल्या स्मार्टफोनमध्ये मेरानेट अॅप इंस्टॉल करावा लागेल. त्यानंतर युजर्संना वर्षभरासाठी सब्सक्रिप्शन द्यावे लागेल. कंपनीने डेटा वापरासाठी कोणतीही मर्यादा घातलेली नाही. युजर्स आपल्या गरजेनुसार डेटा वापरू शकतात.हा प्लॅन यशस्वी झाला तर डेटाविंड बीएसएनएल शिवाय दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांसोबतही करार करेल.  

Read More