Uploading Photos For Ghibli Style AI Images: डिजीटल प्रायव्हसीसंदर्भातील तज्ज्ञ मंडळींनी सोशल मीडियावरुन या 'घिब्ली'संदर्भात सावधानतेचा इशारा दिला आहे. ओपन एआय या 'घिब्ली' ट्रेण्डच्या माध्यमातून एआय ट्रेनिंगसाठी कोट्यवधि लोकांचे खासगी फोटो जमा करु शकते, असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एकीकडे अनेकजण सध्या हा ट्रेण्ड ए्न्जॉय करत असताना दुसरीकडे आपलं कार्टुन स्वरुपातील रुप पाहण्याच्या नादात अनेकजण स्वत:चा फेशीअल डेटा ओपन एआयकडे सोपवत असल्याने या माध्यमातून डिजीटल सुरक्षेसंदर्भात मोठा पेच भविष्यात निर्माण होऊ शकतो अशी शक्यता या तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे.
आर्टिफिशीअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या फोटोंवर मालकी हक्क या कंपन्यांचा असणार आहे. त्यामुळे भविष्यात कार्टुन रेखाटणाऱ्या किंवा कलाकारांवर उपजिविकेसाठी काय करावं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या नव्या ट्रेण्डच्या माध्यमातून अपलोड केलेले फोटो या कंपन्या थेट वापरु शकतात. या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले फोटो वापरण्यावरुन कंपन्या कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता अगदीच धूसर असल्याचं मानलं जात आहे.
'जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन' म्हणजेच 'जीडीपीआर'च्या माध्यमातून जगभरामध्ये एआयवर अपलोड होणाऱ्या कंटेटसंदर्भात काही सर्वसामान्य नियम तयार करण्यात आले आहेत. यामधील आर्टीकल 6.1ए नुसार लोक स्वत:हून एआयवर फोटो अपलोड करत असतील तर हे फोटो वापरण्याचा अधिकार ते या माध्यमाला देतात. यामुळे हे असले फोटो वापरण्याचा कायदेशीर हक्क युझर जेव्हा फोटो अपलोड करतो तेव्हाच ओपनएआयकडे देतो, असं म्हटलं तरी हरकत नाही. 'टेक आणि प्रायव्हसी अकादमी' तसेच 'एआय'च्या सहसंस्थापक असलेल्या लुईझा झालोव्हास्की यांनी आपल्या एका एक्स पोस्टमध्ये यासंदर्भात सविस्तरपणे लिहिलेलं आहे.
ओपनएआय हे माध्यम वापरुन फोटो अपलोड करताना ज्या परवानगी दिल्या जातात. त्यामध्ये वापरकर्त्याच्या परवानगी शिवाय त्यांनी अपलोड केले फोटो आणि खासगी डेटा कंपनी गोळा करु शकते असं अटी आणि शर्थींमध्ये म्हटल्याचं, लुईझा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. लुईसा यांनी 'घिब्ली'च्या माध्यमातून अपलोड होणाऱ्या फोटोंमधील खासगी माहिती आणि फोटो हे ओपनएआयला सहज मिळू शकतात. तसेच या फोटोंचं मूळ कुठे आहे म्हणजेच नेमका वापरकर्ता कोण आहे याची माहिती फक्त कंपनीकडे असणार. लोकांना दिसताना केवळ कार्टून स्वरुपातील फोटो दिसणार आहे. म्हणजेच 'घिब्ली'चा वापर करणाऱ्यांनी कंपन्यांना आपल्या खासगी फोटोंचा अधिकार दिला असून आता घिब्ली वापरलेल्या युझर्सने अपलोड केलेले त्यांचे सर्व खासगी फोटो कंपन्यांना पूर्वपरवानगीशिवाय वापरता येणार आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Most people haven't realized that the Ghibli Effect is not only an AI copyright controversy but also OpenAI's PR trick to get access to thousands of new personal images; here's how:
— Luiza Jarovsky (@LuizaJarovsky) March 29, 2025
To get their own Ghibli (or Sesame Street) version, thousands of people are now voluntarily… pic.twitter.com/zBktscNOSh
'हिमाचल सायबर वॉरिअर्स' नावाच्या स्वयंघोषित सायबर सुरक्षा ग्रुपनेही, "घिब्ली वापरताना काळजी घ्या. तुम्ही गरजेपेक्षा अधिक किंमत तर मोजत नाहीत ना? तुमचे फोटो हे चुकीच्या कारणासाठी आणि वाटेल तसे वापरले जाऊ शकतात. तुमच्या परवानगीशिवाय या फोटोंचा वापर एआय ट्रेनिंगसाठी होऊ शकतो. ही माहिती डेटा ब्रोकर्सकडून जाहिरातदारांना विकली जाऊ शकते. सायबर स्मार्ट राहा. तुम्ही प्रायव्हरी मोलाची आहे," असा सल्ला दिला आहे.
Think before you #Ghibli
— Himachal Cyber Warriors (@hpcyberwarriors) March 29, 2025
That cute “Ghibli-style” selfie? It might cost more than you think.
Your photo could be misused or manipulated.
AI may train on it without your consent.
Data brokers might sell it for targeted ads.
Stay cyber smart. Your privacy matters.… pic.twitter.com/aEjT3sHtTN
आता 'घिब्ली'संदर्भातील सुरक्षेवरुन चर्चा होऊ लागली असली तरी याबद्दल ओपनएआयने कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.