नवी दिल्ली - इन्स्टंट मेसेजिंग एप्स व्हॉट्सऍप लवकरच डार्क मोड फिचर सादर करण्याच्या तयारीत आहे. डार्क मोड फिचर खूप दिवसांपासून चर्चेत आहे. WABetainfo ने एका स्क्रिनशॉटच्या माध्यमातून युजर्सला याची माहिती दिली आहे. डार्क मोड कशा प्रकारे दिसणार आहे? याची माहिती या स्क्रिनशॉटमधून दाखवण्यात आली आहे. ऍन्ड्रॉइड युजर्सला हे फिचर वापरता येणार आहे. युट्यूब, गुगल मॅप, ट्विटर यासारख्या एप्समध्ये अगोदरच डार्क मोड सुविधा देण्यात आली आहे. तसेच इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपच्या युजर्सना लवकरच डार्कमोड फिचरचा वापर करता येणार आहे.
A follower sent me this **concept** of WhatsApp for Android with a Dark Mode (OLED compatible).
— WABetaInfo (@WABetaInfo) January 20, 2019
Do you like it? pic.twitter.com/DxGZtdNqZy
डार्क मोड फिचरमुळे पांढऱ्या रंगाचे बॅकग्राउंड काळ्या रंगाचे दिसणार आहे. पांढऱ्या बॅकग्राउंडमुळे अंधारात व्हाट्सऍपचा वापर करताना युजर्सला त्रास होतो. नव्या मोडमुळे युजर्सला त्यांच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकवता येणार आहे. गुगलच्या रिसर्चनुसार, डार्कमोड फिचरमुळे ४३ टक्के बॅटरी कमी वापरली जाईल. या ऍपला ऍन्ड्राइड व्हर्जन ९ सोबत लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सऍपकडून जगभरात मेसेज फॉरवर्ड करण्याच्या सुविधेवर मर्यादा घालण्यात आली आहे. युजर्स एकावेळी अनेकांना मॅसेज फॉरवर्ड करु शकत होते. परंतु, आता केवळ ५ जणांना मेसेज फॉरवर्ड करता येणार आहे.