Marathi News> टेक
Advertisement

७६९ रुपयात खरेदी करा, फिचर फोन!

 मोबाईल आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे.

७६९ रुपयात खरेदी करा, फिचर फोन!


नवी दिल्ली: हे खर आहे की, मोबाईल आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईल निर्माते वेगवेगळ्या वैशिष्ट्यासह स्मार्टफोन बाजारात घेवून येत आहेत. भारतात असे काही वर्ग आहेत, त्यांचा जवळ फिचर फोनदेखील नाहीत. याचा विचार करुनच चीनच्या डू कंपनीने असं पाऊल उचललं आहे. डू मोबाईल कंपनीने दोन नवीन फिचर फोन अनावरण केले आहेत.  नवीन वैशिष्ट्यांसह एम३१ आणि एम३ च्या नावाने सादर करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ह्या फोनमध्ये अनेक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये रिअर कॅमेरा, कॅाल रेकॅार्डिंग आणि एलईडी टॅार्च यासारखी सुविधा देण्यात आली आहे.   

 

डू फोनची किंमत

डू फोन एम३१ची किंमत ७६९ रुपये आहे, तसेच एम३ची किंमत ७९९ रुपये आहे. या फोन मध्ये २२ भाषांचा समावेश करण्यात आला आहे.  डू कंपनीचे विक्री विभाग प्रमुख संदीप मेहरा म्हणाले की, "देशातील प्रत्येक लोकांजवळ हा फोन पोहचविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यासाठीच कंपनीने स्वस्त आणि टिकाऊ फोन सादर केला आहे." 

 

डू मोबाईल फिचर्स 

डू मोबाईल फोनची चर्चा केली तर दोन्ही फोनमध्ये १.८ इंचचा डिस्प्ले आणि रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात ब्लूटुथ, जीपीएसदेखील आहे. या फोनमधून मल्टिमीडियाच्या चांगल्या अनुभवासहीत मनोरंजनाचादेखील आनंद घेता येणार आहे. डू मोबाईल एम३१ फोनमध्ये ८०० एमएएचची बॅटरी दिली आहे. तर एम३ फोनमध्ये १ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Read More