Marathi News> टेक
Advertisement

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता मोबाईल वापरतो? त्याची किंमत किती? सुंदर पिचाईंकडील फोननेही वेधलं लक्ष

Which Mobile Elon Musk Sundar Pichai: डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीमधील एक फोटो सध्या व्हायरल होतोय.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता मोबाईल वापरतो? त्याची किंमत किती? सुंदर पिचाईंकडील फोननेही वेधलं लक्ष

Which Mobile Elon Musk Sundar Pichai: अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. अमेरिकेतील या शपथविधी सोहळ्याला राजकीय नेत्यांबरोबरच उद्योग जगतामधील नामवंत व्यक्ती हजर होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्या अमेरिकेमध्ये आहेत. या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यात होते. ज्यामध्ये गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, एक्स तसेच टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग, अॅमेझॉनचे जेफ बेजोस आणि अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांचा समावेश होता. हे सर्व मान्यवर एका रांगेत उभे असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या सर्वांच्या संपत्तीचा विचार करता हा फोटो 'जगातील सर्वात महागडा फोटो' म्हणून व्हायरल होत आहे. मात्र त्याचबरोबर या टेक जायंट्सपैकी दोघे म्हणजेच सुंदर पिचाई आणि मस्क मोबाईल वापरतानाचाही एक फोटो व्हायरल झालाय. त्यामुळेच हे दोघे नेमका कोणता मोबाईल वापरतात याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

मस्क कोणता फोन वापरतात?

आपल्यासारखे सर्वसामान्य लोक अगदी काही हजारांपासून मिळणारे स्मार्टफोन वापरतात. सर्वसाधारणपणे असल्या फोन्सची किंमत अगदी 8 हजारांपासून ते लाखभर रुपयापर्यंत असते. मात्र श्रीमंत व्यक्तींचे थाट वेगळे असतात तशीच त्यांच्या फोनची निवडही त्यांच्या श्रीमंतीला आणि स्टेटसला साजेशी असतेत. म्हणूनच ट्रम्प यांच्या शपथविधीमधील फोटो पाहून मस्क आणि पिचाई नक्की कोणते फोन वापरतात याची चर्चा सुरु झाल्याचं दिसतंय. व्हायरल झालेले हे फोटो नीट पाहिल्यास मस्क यांच्या हातात आयफोन असल्याचं दिसून आलं. मस्क यांच्या हातातील फोन आयफोन 16 प्रो हा मॉडेल आहे.

मस्क वापरत असलेल्या फोनची भारतात किंमत किती?

सध्याच्या घडीला आयफोन 16 प्रो हा अॅपलचा फ्लॅगशिप म्हणजेच सर्वात प्रिमिअम आणि कंपनीची ओळख म्हणून प्रमोट केला जणारा फोन आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात हा फोन बाजारात दाखल झाला आहे. भारतामध्ये हा फोन आयफोन 16 प्रो मॅक्सची प्राइज 1 लाख 84 हजार रुपये इतकी आहे. तर 256 जीबीचा हा फोन 1 लाख 37 हजारांना उपलब्ध आहे.

पिचाई कोणता फोन वापरतात?

सर्च इंजिन, व्हिडीओ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये अग्रगण्य कंपनी असलेल्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोणता फोन वापरतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ते सुद्धा आयफोन वापरतात असं वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. एकीकडे मस्क हे आयफोन वापरताना दिसत असतानाच त्यांच्या शेजारी उभे राहून आपल्या फोनमध्ये डोकं घालून उभे असलेले सुंदर पिचाई हे त्यांचा फोन तपासत आहेत. सुंदर पिचाईंच्या हातातील फोन हा गुगलचा पिक्सल 9 किंवा गुगल पिक्सल 9 एक्सएल आहे. हा गुगलचा फ्लॅगशीप फोन आहे.

पिचाईंकडील फोनची भारतातील किंमत किती?

पिचाई हे आपल्या कंपनीच्या ब्रॅण्डशी लॉयल असल्याची चर्चा यावरुन सुरु झाली आहे. गुगल पिक्सल 9 एक्सएलची किंमत 1 लाख 39 हजार रुपये इतकी आहे.

Read More