वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात नामांकित प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. ज्याच्या लोकप्रियतेची चर्चा जवळजवळ प्रत्येक देशात केली जाते. भारतातील लोकही त्यांना खूप मानतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते नसले तरी त्यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. आता ओबामा यांनी आपल्या चाहत्यांना एक खास मेसेज दिला आहे. त्यानी चाहत्यांसाठी ट्विट करुन आपला वैयक्तिक मोबाईल नंबर शेअर केला आहे.
All right, let's try something new. If you’re in the United States, send me a text at 773-365-9687 — I want to hear how you're doing, what's on your mind, and how you're planning on voting this year.
— Barack Obama (@BarackObama) September 23, 2020
I'll be in touch from time to time to share what's on my mind, too. pic.twitter.com/NX91bSqbtG
बराक ओबामा यांनी ट्विट करत म्हटले आहे, चला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया. जर आपण अमेरिकेत असाल तर आपण मला या क्रमांकावर 7773-365-9687 संदेश पाठवू शकता. मला माहित आहे की आपण कसे आहात, आपल्या मनात काय विचार आहेत आणि आपण यावर्षी मत देण्याची तयारी कशी करता आहात. मी माझे विचार वेळोवेळी आपल्यासमवेत सामायिक करेन.
या नंबरच्या माध्यमातून आपण ओबामांना आपला मुद्दा सांगू शकता. बराक ओबामांना संदेश पाठवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. बराक यांच्या या संदेशानंतर त्यांचे चाहते खूप आनंदित आहेत. चाहत्यांशी संपर्कात रहाण्यासाठी हा संदेश ५९ वर्षीय ओबामा यांनी शेअर केला आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी मागणी केली आहे, मिशेल ओबामा यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी.
यावर्षी मे महिन्यामध्ये त्यांनी महाविद्यालयीन पदवीधरांसमोर भाषण केले, हे भाषण ऐकल्यानंतर त्यांचे बरेच चाहते भावूक झाले. त्यांचे भाषण ऐकून बरेच चाहते खूप भावूक झाले आणि त्यांनी ४४ वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. ओबामा यांनी दिलेल्या विशेष फोन नंबरमध्ये 733 एरिया कोड आहे, जो त्यांनी दत्तक घेतलेल्या शिकागो या मूळ गावाचा आहे.