BSNL offers: फक्त 1 रुपयात आजकाल काय मिळत? साधा चहा प्यायला गेलात तरी तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतात. अशावेळी 1 रुपयांमध्ये तुम्हाला जर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळत असेल तर? हो. बीएसएनएलच्या या निर्णयामुळे भारतातील खासगी कंपन्यांची धडधड वाढली. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीने एक क्रांतिकारी पाऊल उचलत खाजगी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार धक्का दिलाय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बीएसएनएलने केवळ १ रुपयात एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन सादर केलाय. ज्यामुळे यूजर्सना प्रचंड फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमुळे आता तुम्ही आता मोकळ्या मनाने व्हिडिओ पाहू शकता, कॉल करू शकता आणि इंटरनेटचा मनसोक्त वापर करू शकता. चला, या प्लॅनच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
बीएसएनएलने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर या "फ्रीडम ऑफर"ची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत, नवीन ग्राहकांना फक्त 1 रुपयात 30 दिवसांची वैधता असलेला प्लॅन मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटामध्ये इंटरनेटचा मुबलक वापर करता येणार आहे. यात तुम्ही व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगचा आनंद घेऊ शकता. देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, राष्ट्रीय रोमिंगसह.दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील. ज्यामुळे तुम्ही मित्र-परिवारांशी संपर्कात राहू शकता. तसेच एका महिन्यापर्यंत कोणतीही काळजी न करता सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
ही ऑफर 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. नवीन ग्राहक केवळ 1 रुपयात बीएसएनएलचे सिम कार्ड खरेदी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तसेच, जुन्या ग्राहकांनाही 1 रुपयात ही ऑफर उपलब्ध आहे, असे कंपनीने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.
Azadi ka plan at just Rs. 1/- & get true digital freedom with BSNL.
— BSNL India (@BSNLCorporate) July 31, 2025
With 30 days of unlimited calls, 2GB data/day, 100 SMS/day, and a free SIM.
Applicable for new users only.#BSNL #DigitalIndia #IndependenceDay #BSNLFreedomOffer #DigitalAzadi pic.twitter.com/L9KoJNVaXG
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या अलीकडील अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) च्या ग्राहकसंख्येत घट झालीय. यामुळे खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलवर दबाव वाढला आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी बीएसएनएलने हा आकर्षक प्लॅन आणला आहे, ज्यामुळे नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि विद्यमान ग्राहकांना टिकवून ठेवणे शक्य होईल.
सरकारने बीएसएनएलला प्रति यूजर सरासरी महसूल (एआरपीयू) 50 टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य दिले आहे. यासाठी कंपनीने दरमहा आढावा बैठका घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांचा भार वाढू नये यासाठी प्लॅनच्या किमती वाढवण्याऐवजी आकर्षक ऑफर्स आणण्यावर भर दिला जाणार आहे. या नव्या ऑफरमुळे बीएसएनएलला ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची आणि बाजारपेठेतील आपली हिस्सेदारी वाढवण्याची संधी आहे.
हा 1 रुपयांचा प्लॅन बीएसएनएलच्या डिजिटल क्रांतीचा एक भाग आहे. कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंग, हाय-स्पीड डेटा आणि मोफत एसएमएस यांसारख्या सुविधा देऊन बीएसएनएलने खाजगी कंपन्यांना थेट आव्हान दिले आहे. विशेषतः नवीन ग्राहकांसाठी ही ऑफर अत्यंत फायदेशीर आहे, कारण 1 रुपयात नवीन सिम कार्डसह इतके फायदे मिळणे ही अभूतपूर्व संधी आहे.
नवीन ग्राहकांनी जवळच्या बीएसएनएल केंद्रातून 1 रुपयात सिम कार्ड खरेदी करावे.ऑफरचा लाभ घेण्यासाठी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत रिचार्ज करावे. जुन्या ग्राहकांना बीएसएनएलच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे बीएसएनएलचा हा 1 रुपयांचा प्लॅन टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवणारा आहे. कमी किमतीत इतके फायदे देणारी ही ऑफर ग्राहकांसाठी खरोखरच "डिजिटल स्वातंत्र्य" घेऊन आल्याचे म्हटले जाते. खासगी कंपन्यांच्या महागड्या प्लॅन्सना पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर वरदान ठरणार आहे.