Marathi News> टेक
Advertisement

तुमच्या फोनमध्ये आताच करा ही सेटिंग्ज; जिओ, एअरटेल असो की VI, इंटरनेट पळेल सुसाट!

Mobile 5g Internet: जर तुम्हीही जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन यूजर्स असाल आणि तुमच्या फोनमध्ये 5G इंटरनेट चालू नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. 

तुमच्या फोनमध्ये आताच करा ही सेटिंग्ज; जिओ, एअरटेल असो की VI, इंटरनेट पळेल सुसाट!

Mobile 5g Internet: व्होडाफोन आयडियाने अलीकडेच देशातील अनेक शहरांमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने दिल्ली, मुंबई, चंदीगड आणि पटना नंतर बेंगळुरूमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली. 2022 मध्ये व्होडाफोन-आयडियाने जिओ आणि एअरटेलसह 5G स्पेक्ट्रम लिलावात भाग घेतला. असे असले तरी एजीआर देयकेसह अनेक समस्यांमुळे, कंपनी त्यांची 5G सेवा वेळेवर सुरू करू शकली नाही. यूजर्सना आता या 5 शहरांमध्ये व्होडाफोन-आयडियाची 5G सेवा मिळू लागलीय. त्याच वेळी जिओ आणि एअरटेलने त्यांचे 5G नेटवर्क देशातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये वाढवलंय.

वेगवान इंटरनेट 

जर तुम्हीही जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन यूजर्स असाल आणि तुमच्या फोनमध्ये 5G इंटरनेट चालू नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. फोनमध्ये काही मूलभूत सेटिंग्ज करून तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क मिळू लागेल. 5जी मध्ये यूजर्सना 4जी च्या तुलनेत 10 पट वेगाने इंटरनेट सेवेचा लाभ मिळतो. जिओ आणि एअरटेलच्या 5जी नेटवर्कमध्ये यूजर्सना 200 एमबीपीएस पेक्षा जास्त वेगाने इंटरनेट डेटा मिळतोय.

जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

5जी इंटरनेट वापरण्यापूर्वी तुम्ही प्रथम 5जी सक्षम स्मार्टफोन वापरत आहात की नाही हे तपासा. जर तुम्ही 5जी स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सहजपणे 5जी नेटवर्क मिळेल. जर तुमच्या 5जी स्मार्टफोनमध्ये ४जी सिग्नल मिळत असेल तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन नवीनतम सॉफ्टवेअरसह अपडेट करावा लागेल. यासाठी फोन सेटिंग्जमध्ये जा आणि सॉफ्टवेअर अपडेटवर टॅप करा. नवीन अपडेट डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये कोणतीही समस्या येणार नाही.

मोबाइल नेटवर्क निवडा

अँड्रॉइड किंवा आयफोन वापरकर्त्यांना त्यांच्या फोन सेटिंग्जमध्ये मोबाइल नेटवर्क पर्यायावर जा. त्यानंतर टेलिकॉम ऑपरेटर पर्यायावर जा आणि मोबाइल नेटवर्क निवडा. आता पसंतीचे नेटवर्क म्हणून 5जी/4जी/3जी/2जी पर्यायावर टॅप करा. आता तुम्हाला 5G नेटवर्क मिळू लागेल. 5G स्मार्टफोनमध्ये 5G हे डिफॉल्टनुसार पसंतीचे नेटवर्क म्हणून निवडले जाते.

5G नेटवर्क कव्हरेज तपासा

यानंतरही जर तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क येत नसेल, तर तुमच्या क्षेत्रातील 5G ​​कव्हरेज चांगले नसण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटरच्या वेबसाइटवर जाऊन 5G कव्हरेज तपासावे लागेल. गरज पडल्यास तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरच्या कस्टमर केअरला कॉल करून नेटवर्कशी संबंधित समस्येचे निराकरण करू शकता. 4G सिम कार्ड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना 5G सेवेसाठी वेगळे सिम कार्ड घेण्याची आवश्यकता नाही, हे ध्यानात ठेवा.

Read More