Marathi News> टेक
Advertisement

Hyundai चा Tata, Maruti ला दणका! ड्युअल-सिलेंडरसह लाँच केली आपली सर्वात स्वस्त CNG एसयुव्ही, किंमत फक्त...

Hyundai Exter च्या नव्या EX व्हेरियंटचा समावेश कऱण्यात आल्यानंतर या सीएनजी एसयुव्हीच्या किंमतीत 1 लाखांची घट करण्यात आली आहे.   

Hyundai चा Tata, Maruti ला दणका! ड्युअल-सिलेंडरसह लाँच केली आपली सर्वात स्वस्त CNG एसयुव्ही, किंमत फक्त...

हुंडाई मोटर इंडियाने आपली प्रसिद्ध आणि सर्वात स्वस्त एसयुव्ही Exter CNG चं परडवणारं व्हेरियंट लाँच केलं आहे. Exter Hy-CNG आता एंट्री-लेव्हल EX व्हेरियंटसह उपलब्ध आहे. या नव्या व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 7.5 लाख (एक्स शोरुम) इतकी ठरवण्यात आली आहे. याआधी एक्सटर सीएनजी ला मिड-स्पेक S, SX आणि SC नाइट एडिशन सह सादर करण्यात आलं होतं. नवीन EX ट्रिमसह, एक्सटीरियर हाय-सीएनजी आता 1 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. कमी किंमत निश्चितच मागणी सुधारण्यास मदत करेल.

Exter EX Hy-CNG मधे काय खास आहे?

लूक आणि डिझाइनच्या बाबतीत ही नियमित एक्स्टर एसयुवी सारखीच आहे. यामध्ये कंपनीने ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच यामध्ये दोन वेगवेगळे सीएनजी टँक मिळतात. जे बूट म्हणजेच कारच्या डिक्कीत खाली लावण्यात येतील. यामुळे सीनएजी कार असतानाही तुम्हाला बूट स्पेससह काही तडतोड करावी लागणार नाही. 

Exter CNG मध्ये, कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहेत. जे 69hp ची पॉवर आणि 95.2Nm टॉर्क जनरेट करताच. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, यात 60 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. ही सीएनजी एसयूव्ही 27.1 किमी/किलो पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

एक्स्टर एक्स सीएनजी व्हेरियंटमध्ये काय फिचर्स आहेत?

6 एअरबॅग्ज स्टँटर्ड
10.67 सेमी (4.2") रंगीत टीएफटी मिड डिजिटल क्लस्टरसह
सिग्नेचर एच-एलईडी टेल लॅम्प
ड्रायव्हिंग सीट हाइट एडजस्टमेंट
कीलेस एंट्री
सेंट्रल लॉकिंग सिस्टम

एंट्री लेव्हल मॉडेल म्हणून, ही सीएनजी एसयूव्ही इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (ईबीडी) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), थ्री-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, एच-आकाराचे एलईडी टेललॅम्प, बॉडी कलर बंपर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो, अॅडजस्टेबल रिअर हेडरेस्ट, मॅन्युअल एअर कंडिशन (एसी) आणि रिअर पार्किंग सेन्सर यासारख्या फिचर्ससह येते.

बाजारात या सीएनजी एसयुव्हीची स्पर्धा टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्राँक्ससह असणार आहे. या दोन्ही एसयुव्ही सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. या सीएनजी मॉडेलची किंमत अनुक्रमे 7.30 लाख आणि 8.47 लाख आहे. 

 

Read More