Marathi News> टेक
Advertisement

अवघ्या 7 हजारात मिळतोय iPhone 16 सारखा दिसणारा फोन, फिचर्सही तगडे

Infinix Smart 10: इन्फिनिक्स स्मार्ट 10 हा फोन त्याच्या डिझाइन आणि लूकमुळे iPhone 16 सारखा वाटतो. 

अवघ्या 7 हजारात मिळतोय iPhone 16 सारखा दिसणारा फोन, फिचर्सही तगडे

Infinix Smart 10: इन्फिनिक्सने भारतात आपल्या स्मार्ट सिरीज अंतर्गत आणखी एक परवडणाऱ्या किंमतीतील स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन इन्फिनिक्स स्मार्ट 10 या नावाने लॉन्च करण्यात आला आहे. या सेगमेंटमधील हा पहिलाच फोन आहे जो पुढील 4 वर्षे कोणत्याही अडथळ्याशिवाय उत्तम कामगिरी देईल, असा कंपनीचा दावा आहे. याचा अर्थ कंपनी या फोनसाठी 4 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे. 

किती पर्यायात उपलब्ध?

या फोनमध्ये इन्फिनिक्सच्या AI फीचर्स आहेत आणि यात 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. इन्फिनिक्स स्मार्ट 10 हा फोन त्याच्या डिझाइन आणि लूकमुळे iPhone 16 शी साम्य दाखवतो. कंपनीने हा फोन केवळ एकाच स्टोरेज पर्यायात – 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज – सादर केला आहे. 

डिस्प्ले कसा आहे?

हा स्मार्टफोन 2 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.इन्फिनिक्स स्मार्ट 10 ची वैशिष्ट्येइन्फिनिक्स स्मार्ट 10 च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या फोनमध्ये 6.67 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 

स्टोरेज किती?

कंपनीने यात IPS LCD पॅनलचा वापर केला आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 700 nits इतकी आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. हा फोन Unisoc T7250 प्रोसेसरवर चालतो, जो 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. विशेष म्हणजे, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

कॅमरे कसा?

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 आधारित XOS 15.1 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत आहे. यात इन्फिनिक्सचे खास AI फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 8MP चा मुख्य कॅमेरा आणि एक दुय्यम सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

सामान्य यूजर्ससाठी कसा पर्याय?

याशिवाय, हा फोन IP64 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षित आहे. इन्फिनिक्स स्मार्ट 10 हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे, जो iPhone 16 सारखा प्रीमियम लूक, दमदार बॅटरी आणि आधुनिक AI वैशिष्ट्यांसह येतो. 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा फोन सामान्य वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

किंमत किती?

हा फोन आयरिस ब्लू, स्लीक ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि ट्वायलाइट गोल्ड या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 6,799 रुपये इतकी आहे.

Read More