Marathi News> टेक
Advertisement

1500 हून कमी किंमतीत उपलब्ध होणार 'हा' स्मार्टफोन, 17 दिवस चालणार बॅटरी

स्मार्टफोन घेताना प्रामुख्याने विचार केला जातो तो म्हणतो बॅटरी, कॅमेरा आणि मेमरीचा.

1500 हून कमी किंमतीत  उपलब्ध होणार 'हा' स्मार्टफोन, 17 दिवस चालणार बॅटरी

मुंबई  : स्मार्टफोन घेताना प्रामुख्याने विचार केला जातो तो म्हणतो बॅटरी, कॅमेरा आणि मेमरीचा.

फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकणारी असेल तर तो चार्ज करण्याची कटकट आपोआपच कमी होते. 

17 दिवस चालणार बॅटरी  

भारतीय मोबाईल कंपनी लावा  लवकरच बाजारात एक दमदार मोबाईल आणणार आहे. 'डिझाईन इन इंडिया'च्या अंतर्गत लावा 'प्राईम एक्स' हा मोबाईल बाजारात आणणार आहे.

जरूर वाचा :  मोबाईल सारखा स्लो होतोय ? या चार गोष्टी करा

प्राईम एक्सची वैशिष्ट्य काय ? 

प्राईम एक्स हा मोबाईल संपूर्णपने भारतामध्ये बनवला जाणार आहे. 

या फोनची बॅटरी बॅकअप 17 दिवस असेल. 

दोन वर्षांच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह हा मोबाईल बाजरात उपलब्ध असेल.  

या फोनची किंमत 1499 रूपये असेल. 

ऑक्टोबर 2018  मध्ये हा फोन बाजारात उपलब्ध होईल.  

आकर्षक फीचर्स आणि स्वस्त किंमतीत भारतात बनवला जाणार्‍या या मोबाईलला विकत घेण्यासाठी ग्राहकांची उडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जरूर वाचा :  मोबाईलच्या 'पॉवर' बटणाचे 2 महत्त्वाचे फायदे


ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागेल  

'डिझाईन इन इंडिया' द्वारा बनवला जाणारा हा पाहिला मोबाईल आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये उपलब्ध होणार्‍या या फोनसाठी 2016 साली नोएडामध्ये डिझाईन सेंटर सेटअप करण्यात आले होते. 
2021 पर्यंत मोबाईलच्या सार्‍या रेंजच्या डिझाईन आणि ,मॅन्युफॅक्चरिंग भारतमध्ये बनवण्याचा आणि लॉन्च करण्याचा प्लॅन आहे. याकरिता लावाच्या डिझाईन कंपनीने चीनमध्ये सुमारे वर्षभराहून अधिक वेळ चीनमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.   

Read More