Marathi News> टेक
Advertisement

फक्त 7.99 लाखात खरेदी करा महिंद्राची 'ही' SUV; सेफ्टीमध्ये नाही तोड

Mahindra Budget Friendly SUV : महिंद्राची बजेट फ्रेंडली SUV आजच करा बूक... 

फक्त 7.99 लाखात खरेदी करा महिंद्राची 'ही' SUV; सेफ्टीमध्ये नाही तोड

Mahindra Budget Friendly SUV : भारतामध्ये सबकॉम्पॅक्ट एसयूवीज खरेदी करण्याचा ट्रेंड हा जवळपास गेल्या 5 वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात आता कार निर्माता कंपन्या या सेगमेंटवर सर्वाधिक लक्ष देत आहेत. याचं कारण म्हणजे या एसयूव्हींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांची विक्री वाढण्याचं कारण म्हणजे त्यांची किंमत ही इतर गाड्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. या सेगमेंटमध्ये महिंद्राच्या XUV300 चा देखील समाविष्ट आहे. हे लक्षात घ्या की या एसयूवीला 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे आणि तिची किंमतही बजेटमध्ये बसते. जर तुम्ही ही एसयूवी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला खास स्पेसिफिकेशन्स सांगणार आहोत.

किंमत

ही एसयूवी 7.99 लाख रुपये पासून सुरू होते. ती चार ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे - MX, AX, AX5 आणि AX7. तथापि, इंजिन ऑप्शन्स XUV300 सारख्याच आहेत, पण डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे अपडेट करण्यात आले आहेत. डिझाइन थोडं वेगळं आहे, 

इंजिन

या एसयूवीमध्ये तीन इंजिन ऑप्शन्स आहेत

1.2L टर्बो पेट्रोल (110 बीएचपी)
1.2 लीटर डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो पेट्रोल (131 बीएचपी)
1.5 लीटर डिझेल (117 बीएचपी)
त्यात 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 6-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचे ऑप्शन आहे. इंटीरियर्स XUV400 इलेक्ट्रिक एसयूवी सारखे दिसतात.

फीचर्स

या एसयूवीमध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड 7-स्पीकर हार्मन कार्डन म्युझिक सिस्टम, 10.25-इंच फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत. यामध्ये ADAS लेवल-2 आणि 360 डिग्री कॅमेरा देखील दिला आहे.

हेही वाचा : दिल्ली, न्यू दिल्ली आणि NCR मध्ये काय आहे फरक तुम्हाला माहितीये?

त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त विक्री झालेल्या गाड्यांमध्ये ही एक गाडी आहे. दरम्यान, ही गाडी स्पेशियस आहे. त्यामुळे प्रवास करणं देखील सोपं आहे. तुम्हाला गाडी खरेदी करायची असल्यास आणि तुमचा हा बजेट असेल तर तुम्ही महिंद्राच्या XUV300 घेण्याचा विचार करू शकता. 

Read More