Marathi News> टेक
Advertisement

पांढरे केस काळे करण्याचा हा फॉर्म्यूला हिट होतोय

यूट्यूबवर पांढरे केस काळे करण्याचा एक फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे.

पांढरे केस काळे करण्याचा हा फॉर्म्यूला हिट होतोय

मुंबई : यूट्यूबवर  पांढरे केस काळे  करण्याचा एक फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे, हा व्हिडीओ भारतात नंबर एकवर ट्रेंडिंग आहे. यूट्यूबवर आरोग्याशी संबंधित अनेक व्हिडीओ येत असतात, त्यात घरगुती उपाय देखील सुचवले जातात. पण अनेक वेळा हे उपाय करण्याआधी थोडीशी माहिती घेणे किंवा शाहनिशा करणे महत्वाचे असते. नाहीतर अनेक वेळा घरगुती पदार्थांचं समीकरण बिघडून अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात नेमके कोणते पदार्थ वापरले आहेत, त्यांचं नक्की प्रमाण किती आहे. तसेच या प्रकारचे फॉर्म्युले या आधीही लोकप्रिय झाले आहेत किंवा इंटरनेटवर आहेत का? याची देखील माहिती घेणे आवश्यक आहे.

Read More