Maruti S-Presso: मारुती सुझुकीच्या कारना भारतीय बाजारपेठेत खूप मागणी आहे. कंपनी त्यांच्या मायक्रो एसयूव्ही असलेल्या एस-प्रेसो कारवर या जुलै महिन्यात कमाल डिस्काउंट देत आहे. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास 62 हजार 500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकते. हे डिस्काउंट AMT व्हेरियंटसाठी असून त्या व्यतिरिक्त मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरियंटवर 57 हजार 500 रुपयांचे कॅश डिस्काउंट मिळणार आहे. यात कॉर्पोरेट डिस्काउंट आणि स्क्रॅपेज बोनसदेखील आहेत.
मारुती एस-प्रेसोची एक्स शोरुम किंमत 4.26 लाख रुपयांपासून ते 6.11 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार 6 एअरबॅग सेफ्टीसह येते. या हॅचबँकला 8 वेगवेगळ्या व्हेरियंटसोबत लाँच करण्यात आले आहे. जेणेकरुन खरेदीदारांना त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडता येईल. Maruti S-Presso एक टॉल बॉय स्टाइल असलेली कार आहे. जी 180 मिमी ग्राउंड क्लियरेससोबत येते. यात 14 इंचाच्या व्हिल्स असून खडबडीत रस्त्यांवरदेखील आरामात धावते.
ही टॉल बॉय स्टांस हॅचबॅक 8 व्हेरियंट्समध्ये येते. यात बेस मॉडल STD आणि टॉप व्हेरियंट VXI CNG देखील आहे. यात 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 68 PS पॉवर आणि 90 एल एम टॉर्क जनरेट करते. हा 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीकडे उपलब्ध आहे. तर CNG व्हर्जन फक्त मॅन्युअल गिअरबॉक्समध्येच येते. मारुती Maruti S-Presso पेट्रोल व्हेरियंटमध्ये 24.12 ते 25.30 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये 32.73 किमी प्रति किमीपर्यंत मायलेज देण्याचा दावा करतात.
या हॅचबॅकमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल क्लस्टर, ड्युअल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर, हिल होल्ड असिस्ट आणि ABS+EBD सारखी वैशिष्ट्ये आहेत. कमी बजेटमध्ये चांगले मायलेज आणि वैशिष्ट्ये हवी असलेल्यांसाठी मारुती एस-प्रेसो एक विश्वासार्ह पर्याय बनला आहे. मारुती एस-प्रेसोच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पेट्रोल एमटी व्हेरिएंटचा मायलेज प्रतिलिटर 24 किमी, पेट्रोल एमटी मायलेज प्रतिलिटर 24.73 किमी आणि सीएनजी व्हेरिएंटचा मायलेज 32.73 किमी/किलो आहे.