Marathi News> टेक
Advertisement

आता 15 भारतीय भाषांमध्ये बनवू शकाल ईमेल आयडी

मायक्रोसॉफ्टने काल आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने भारतीयांना खूषखबर दिली आहे. आजकाल तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात अपडेट आणि सार्‍या जगाशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रत्येकाकडे इमेल आयडी हा असतोच. पण तुमच्याकडे आजपर्यंत इंग्रजी भाषेतील इमेल आयडी असेल. मात्र आता हाच इमेल आयडी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. 

आता 15 भारतीय भाषांमध्ये बनवू शकाल ईमेल आयडी

मुंबई : मायक्रोसॉफ्टने काल आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने भारतीयांना खूषखबर दिली आहे. आजकाल तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात अपडेट आणि सार्‍या जगाशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रत्येकाकडे इमेल आयडी हा असतोच. पण तुमच्याकडे आजपर्यंत इंग्रजी भाषेतील इमेल आयडी असेल. मात्र आता हाच इमेल आयडी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. 

मायक्रोसॉफ्टची नवी सोय 

मायक्रोसॉफ्ट ग्राहकांना आता भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय खुली करून देणार आहे. त्यानुसार आता भारतीय भाषांमध्ये मेल पाठवण्याची आणि स्वीकारण्याची सोय खुली होणार आहे. 

ऑफीस ३६५, आऊटलूक २०१६, आऊटलूक डॉट कॉम, एक्सचेंज ऑनलाइन, एक्सचेंज ऑनलाइन प्रोटेक्शन यांसारख्या अॅप्लिकेशनवर ही सोय खुली होणार आहे. 

15 भाषांमध्ये ई मेल इमेल बनवण्याची सोय 

मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीच्या टप्प्यामध्ये हिंदी, बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली, मराठी, नेपाळी, सिंधी, बंगाली, गुजराती, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये इमेल आयडी बनवण्याची सोय खुली लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Read More