Marathi News> टेक
Advertisement

हे वेळापत्रक चुकलं, तर तुम्हाला अकरावीत प्रवेश नाही...

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

हे वेळापत्रक चुकलं, तर तुम्हाला अकरावीत प्रवेश नाही...

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या फेरीसाठी आतापर्यंत प्रवेश न मिळालेली, आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, तसेच प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतात.

उर्वरीत विद्यार्थ्यांचे यानुसार तीन गटात विभाजन केलं जाणार आहे. गट क्रमांक एक यात, ८० टक्के ते १०० टक्के गुण प्राप्त केलेले विद्यार्थी, गट क्रमांक २ मध्ये ६० टक्क्यांवर गुण मिळालेले विद्यार्थी, तर शेवटच्या तिसऱ्या गटात दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.

अकरावी प्रवेश mumbai 11th online admission

२५ ऑगस्ट २०१८ | सकाळी ११ वाजता | शिल्लक असलेल्या रिक्त जागा mumbai.eleventh.net या संकेत स्थळावर जाहीर होतील.

२७ ऑगस्ट २०१८ | सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत | गट क्रमांक १ मधील विद्यार्थी आपला अर्जाचा भाग २ भरतील आणि ऑनलाईन सबमीट करतील
२७ ऑगस्ट २०१८ ते २८ ऑगस्ट २०१८  | सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत | प्रवेश प्राप्त झालेल्या महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी जाऊन, आपल्या प्रवेशाची पावती ऑनलाईन सुपूर्द करणे बंधनकारक असेल.

२८ ऑगस्ट २०१८ | सायंकाळी ६ वाजता | गट क्रमांक २ साठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर होईल. 

२९ ऑगस्ट २०१८ | गट क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ भरावा आणि ऑनलाईन सबमीट करावा.
२९ ऑगस्ट २०१८ | सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत  | प्रवेश प्राप्त झालेल्या महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी जाऊन, आपल्या प्रवेशाची पावती ऑनलाईन सुपूर्द करणे बंधनकारक असेल.

३० ऑगस्ट २०१८ | सकाळी ६ वाजता | गट क्रमांक ३ साठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर होईल. 

३१ ऑगस्ट २०१८ | सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत | गट क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ भरावा आणि ऑनलाईन सबमीट करावा.

३१ ऑगस्ट २०१८ ते १ सप्टेंबर २०१८ | सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत | गट क्रमांक ३ मधील विद्यार्थी, प्रवेश प्राप्त झालेल्या महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी जाऊन, आपल्या प्रवेशाची पावती ऑनलाईन सुपूर्द करणे बंधनकारक असेल.

२ सप्टेंबर २०१८ | सकाळी ११ वाजता सर्व रिक्त जागांचा तपशील, संकेत स्थळावर जाहीर होईल.

Read More