Marathi News> टेक
Advertisement

Marutiची कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार ही सुविधा, होणार मोठा फायदा

मारुती कंपनीने आपल्या आगामी लॉन्च होणाऱ्या सर्वच कारमध्ये ऑप्शनल अॅक्सेसरीचमध्ये टायर प्रेशर ऑपरेटींग सिस्टम (TPMS) देण्यास सुरुवात केली आहे.

Marutiची कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार ही सुविधा, होणार मोठा फायदा

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकी (Maruti) कारमध्ये अतिरिक्त सेफ्टी फिचर्स लॉन्च केले जात आहेत. मारुती कंपनीने आपल्या आगामी लॉन्च होणाऱ्या सर्वच कारमध्ये ऑप्शनल अॅक्सेसरीचमध्ये टायर प्रेशर ऑपरेटींग सिस्टम (TPMS) देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या सर्वच डिलर्सकडून कारमध्ये या अॅक्सेसरीज फिट करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

मारुती कंपनीची बेस्ट सेलिंग कार नवी स्विफ्ट, डिजायर आणि ब्रेजामध्ये आता ग्राहकांना हे फिचर्स उपलब्ध झाले आहेत. या तिन्ही कारमध्ये आयक्रिएट कस्टमायझेशन नुसार आपल्या इच्छेनुसार कस्टमाइज करता येणार आहे.

असं काम करतं TPMS

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम कारचं टायर प्रेशर नेहमीच तपासत राहतं. टायर प्रेशर कमी झाल्यास ते ड्रायव्हरला अलर्ट करतं. जर तुमच्या टायरमध्ये हवा कमी असेल तर गाडीचा स्पीड अधिक असल्यास टायर फाटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकते. काही दिवसांपूर्वी दिल्लीत युमना एक्सप्रेस वे वर टायर फुटल्याने अनेक अपघात झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे सेफ्टी फिचर खूपच कामी येणार आहे.

१२,९९० रुपये करावं लागणार पेमेंट

मारुती कंपनीतर्फे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमला ऑफिशियल एक्सेसरी म्हणून ऑफर केलं जात आहे. यासाठी ग्राहकांना १२,९९० रुपयांचं अतिरिक्त पेमेंट करावं लागणार आहे. TPMS मध्ये पाच सेंसर असतात, हे स्टेपनीसह सर्वच चाकांमध्ये उपलब्ध असतं. सर्व सेंसर एअर प्रेशर मोजतात आणि ड्रायव्हरच्या समोर असलेल्या डॅशबोर्डवर डिस्प्लेच्या माध्यमातून सूचना देतात.

इतकचं नाही तर, ड्रायव्हिंग कंडिशननुसार टायर प्रेशर अॅडजस्टही करु शकतात. टायर प्रेशर अधिक असल्यास गाडीचा वेग कमी करावा किंवा काही वेळासाठी गाडी थांबवावी. यामुळे टायर थंड होतात. मारुती सुजुकी कंपनी स्वस्त आणि मस्त कारसाठी भारतात प्रसिद्ध आहे. 

Read More