Marathi News> टेक
Advertisement

OnePlus 13s: 'गेम चेंजर' प्रोसेसर, मेगा बॅटरी आणि AI फीचर्स; वनप्लसच्या नव्या फोनची किंमत किती?

 OnePlus 13s: OnePlus 13s प्रीमियम फोन एका हाताने हाताळण्यास सोपा आहे.

OnePlus 13s: 'गेम चेंजर' प्रोसेसर, मेगा बॅटरी आणि AI फीचर्स; वनप्लसच्या नव्या फोनची किंमत किती?

 OnePlus 13s: वनप्लसने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहिली जात होती. दमदार फिचर्स आणि किंमतीमुळे हा फोन लॉंच होण्याआधीपासूनच चर्चेत होता. OnePlus 13s आणून वनप्लसने फ्लॅगशिप लाइनअपचा विस्तार केलाय. हा एक कॉम्पॅक्ट पण शक्तिशाली स्मार्टफोन आहे. वनप्लसने फोनच्या अनेक फीचर्सबद्दल अद्याप सांगण्यात आले नाही पण अनेक लीक्समधून फोनबद्दल बरीच माहिती मिळाली आहे.

वनप्लस 13 एसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट असून एआय फिचर देण्यात आलंय. OnePlus 13s प्रीमियम फोन एका हाताने हाताळण्यास सोपा आहे. कंपनीने या फोनमध्ये बरेच बदल केले आहेत. फोनच्या प्लस की फीचरबद्दल एक हाइप आहे.या फीचरचे काम भाषांतर, रेकॉर्डिंग, कॅमेरा लाँचिंग आणि बरेच काही आहे. 

हा फोन 6.32 इंच, 1.5K 8T LTPO अमोलेड डिस्प्लेसह येणार आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 nits पीक ब्राइटनेस असेल.याशिवाय, यात 50MP प्रायमरी सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर कॅमेरा असेल. हा अँड्रॉइड 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालेल. त्याचे डिझाइन आणि प्रोसेसरबद्दल बाजारात आधीच चर्चा सुरू आहेत. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट आहे. कंपनी ते तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करणार आहे. ब्लॅक वेल्वेट, पिंक सॅटिन आणि ग्रीन सिल्क मध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

डिझाइन

वनप्लस 13 च्या सिरीजमधील सर्वात कॉम्पॅक्ट मॉडेल म्हणून हा ओळखला जाईल. आरामात वापरता येईल असे वनप्लस 13 एस चे डिझाइन बनवण्यात आलंय. हा सर्वात हलके किंवा सर्वात पातळ डिव्हाइस नाहीय पण संतुलित वजनामुळे वापरताना तुमचा हात थकत नाही. लहान फूटप्रिंट, फ्लॅट-फ्रेम डिझाइन असूनही, किंचित गोलाकार कडा असल्याने तुम्ही सोप्या पद्धतीने याचा वापर करु शकता. 

डिस्प्ले

OnePlus 13s मध्ये 2640 x 1216 (fullHD+) रिझोल्यूशनसह 6.32-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कॉम्पॅक्ट आकार असूनही स्क्रीन त्याच्या आकर्षक आणि एकसमान बेझलमुळे भरपूर मोठी 
स्क्रिन दिसते. यातील हाय ब्राइटनेस मोड (HBM) मध्ये 1600 nits वर पोहोचतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल एलिट चिप, उत्कृष्ट थर्मल मॅनेजमेंट आणि स्मूथ गेमिंगच्या बाबतीत मोठ्या प्रीमियम फोनलाही टक्कर देतो. एआय कॉल असिस्टंट सारखे फिचर्स तुम्हाला चांगला अनुभव देतील.  डिझाइन, AMOLED डिस्प्ले आणि मजबूत बॅटरी लाइफ पॅकेज देण्यात आलंय. 

किंमत किती?

वनप्लसने 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59 हजार 999 रुपये ठेवण्याचे सांगण्यात येतंय. वनप्लस 13s हा एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप म्हणून वेगळा आहे.

Read More