Marathi News> टेक
Advertisement

Pi Day: खास दिवसासाठी गुगलने बनवले हटके डूडल

१४ मार्च हा Pi Day म्हणून साजरा केला जातो. यंदा Pi Dayचे ३०वे वर्ष आहे. Pi हे एक मॅथॅमॅटीकल कॉन्स्टेंट म्हणजेच गणितीय निर्धारक आहे. जगभरातील गणितज्ज्ञ १४ मार्च या दिवशी Pi Day साजरा करतात.
 
Pi Day: खास दिवसासाठी गुगलने बनवले हटके डूडल

मुंबई : आज (बुधवार, १४ मार्च) तुम्ही जर गुगलच्या होमपेजला भेट दिली तर, एक रंगित आणि तितकीच आकर्ष प्रतिमा तुमचे लक्ष वेधून घेईल. ही प्रतिमा काय आहे, म्हणून क्षणभर तुम्हीही विचारात पडाल. पण, तुमच्या डोक्यावरील ताण फार वाढून नये म्हणून आम्हीच तुम्हाला हे सागून टाकतो. हा काय प्रकार आहे.

१४ मार्च हा Pi Day म्हणून साजरा केला जातो. यंदा Pi Dayचे ३०वे वर्ष आहे. Pi हे एक मॅथॅमॅटीकल कॉन्स्टेंट म्हणजेच गणितीय निर्धारक आहे. जगभरातील गणितज्ज्ञ १४ मार्च या दिवशी Pi Day साजरा करतात.

Piचा वापर आणि संशोधन खूप वर्षांपासून सुरू

Piचा वापर आणि याच्याशी संबंधीत संशोधन खूप वर्षांपासून सुरू आहे. मात्र, १७०६ मध्ये सर्वात प्रथम विल्यम जोन्सने π  चा वापर केला. मात्र, याला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती, १७३७मध्ये. जेव्हा स्विस गणितज्ज्ञ लियोनार्ड यूलर यांनी याचा प्रयोग करण्यास सुरूवात केली. Pi Day हा भौतिक विज्ञान शास्त्रातील संशोधक लॅरी शॉ यांनी पहिल्यांदा साजरा केला.

गुगलच्या प्रतिमेचा अर्थ

गुगलने आपल्या डूडलमध्ये पेस्ट्री, बटर, सफरचंद आणि संत्र्याच्या सालीच्या तुकड्याचा वापर केला आहे. तर, GOOGLच्या दुसऱ्या Gसाठी Piचा वापर करण्यात आला आहे. आजचे सुंदर डूडल हे ऑवॉर्ड विनिंग पेस्ट्री शेपने बनवले आहे.

Read More