Marathi News> टेक
Advertisement

तुमचं मोबाईल सिम पोस्टपेड नको, कारण....

कृपया तुमच्या मोबाईल सिम पोस्टपेड करण्याआधी विचार करा.

 तुमचं मोबाईल सिम पोस्टपेड नको, कारण....

मुंबई : तुमचं प्रिपेड सिम पोस्टपेड करण्यासाठी तुम्हाला सतत मोबाईल कंपन्यांकडून सतत फोन येत असल्यास, कृपया तुमच्या मोबाईल सिम पोस्टपेड करण्याआधी विचार करा, कारण बहुतांश मोबाईल कंपन्या सिम प्रिपेडचे पोस्टपेड करण्यासाठी फोन करतात. पोस्टपेड सिम करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे.

प्रीपेडच्या ऑफर पोस्टपेडपेक्षा बेस्ट

ते तुम्हाला कोणतीही ऑफर देतील, पण प्रीपेड एवढी ती निश्चितच चांगली नसेल, यात तुम्हाला पोस्टपेडचे बिल भरण्यास उशीर झाला, तर दंडाची रक्कमही मोठी आहे. तसेच प्रीपेडमध्ये एवढे चांगले प्लान आहेत, की तुम्हाला ते पोस्टपेडमध्ये देखील मिळणार नाहीत.

पोस्टपेडचा आग्रह का?

पोस्टपेडमध्ये मोबाईल कंपन्यांना जास्त मार्जिनने बिझनेस करता येत असावा, यासाठी मोबाईल कंपन्यांनी तुम्ही प्रीपेड सीम, पोस्टपेड करून घ्यावे यासाठी तगादा लावत आहेत.

Read More