Marathi News> टेक
Advertisement

रेस्टोरन्टमध्ये यंत्रमानव झाले वेटर...

एवढंच नव्हे तर, 'सौदी अरेबिया'मध्ये २०१७ साली यंत्रमानवाला चक्क 'नागरिकत्व' देण्यात आले होते. 

रेस्टोरन्टमध्ये यंत्रमानव झाले वेटर...


नवी दिल्ली : जगभरात यंत्रमानव तयार करण्याच्या गतीत वाढ होताना दिसून येत आहे. मानवी कार्याचे ओझे कमी करण्यासाठी कारखान्यांपासून तर घरांपर्यंत यंत्रमानवाचा उपयोग केला जात आहे. आता तर हैदराबाद येथील एका रेस्टोरन्टमध्ये ग्राहकांची ऑर्डर घेण्याचे काम यंत्रमानवाकडे सोपवण्यात आले आहे. ग्राहकांनी ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ त्यांना योग्य पद्धतीने आणून देण्याचे काम हे यंत्रमानव करत आहेत. याआधी 'जपान'मधील टीव्ही चॅनलवर बातमी देण्यासाठी 'निवेदक' म्हणून यंत्रमानवाचा वापर करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर, 'सौदी अरेबिया'मध्ये २०१७ साली यंत्रमानवाला चक्क 'नागरिकत्व' देण्यात आले होते. 

रेस्टोरन्टमध्ये ग्राहकांच्या सेवेत चार यंत्रमानवांचा समावेश करण्यात आला आहे. यंत्रमानवांत विशेष अशी प्रोग्रामिंग सेटींग्स करण्यात आली आहेत. जेणेकरुन ग्राहकांची सेवा करताना ते गोंधळत नाहीत. तीन तास चार्ज केल्यानंतर यंत्रमानव दिवसभर काम करु शकतात. 

 

रेस्टोरन्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांना खाद्यपदार्थाची ऑर्डर करताना अनोख्या पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. रेस्टोरन्टचे मालक माणिकांत यांच्या माहितीनुसार, रेस्टोरन्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांना एक टॅबलेट प्रदान केला जाईल. ग्राहक टॅबलेटद्वारे त्यांच्या आवडीच्या पदार्थांची ऑडर करु शकतात. यंत्रमानव ग्राहकांकडून मिळवलेली ऑर्डर घेउन किचनमध्ये जाईल. ग्राहकांनी ऑर्डर केलेली थाळी तयार करुन देण्यासाठी किचेनमध्ये एक व्यक्ती असणार आहे. तो व्यक्ती जेवणाची थाळी तयार करुन यंत्रमानवाकडे देईल. त्यानंतर ती थाळी योग्य ग्राहकांकडे घेऊन जाण्याचे काम यंत्रमानव करतील...

चेन्नईमधल्या आपल्या रेस्टोरन्टमध्ये अशाच प्रकारे यंत्रमानव काम करत आहेत. त्यांचा या कल्पनेला चेन्नईच्या ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे, अशी माहितीही माणिकांत यांनी दिली.

Read More