Marathi News> टेक
Advertisement

लवकरच लाँच होणार Samsung चा Galaxy S9

सॅमसंग आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन, गॅलेक्सी एस 9 ला लवकरच लाँच होणार आहे. 

लवकरच लाँच होणार Samsung चा Galaxy S9

सियोल : सॅमसंग आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन, गॅलेक्सी एस 9 ला लवकरच लाँच होणार आहे. 

मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन एका कार्यक्रमात लाँच करण्यात येणार आहे. ज्याला अनपॅक्ट नाव देण्यात आले आहे. हा मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2018 हा कार्यक्रम संपण्या अगोदर एक दिवस आधी लाँच केला जाणार आहे. 

द वोगच्या रिपोर्टनुसार, सॅमसंग स्पेनमध्ये सुरू असलेल्या एमडब्ल्यूसीमध्ये लाँच करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 26 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर त्या अगोदर एक दिवस म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी हा लाँच करण्यात येणार आहे. 

व्हिडिओ देखील केला जाहीर 

दक्षिण कोरियाई प्रौद्योगिकी दिग्गजने ट्विटरवर आपल्या आगामी डिवाइस कॅमेऱ्याचे फिचर देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. गॅलेक्सी एस सिरीजचे दोन फोन एकत्र लाँच करण्याच्या परंपरेला यंदात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सॅमसंग गॅलक्सी एस 9  आणि एस 9 प्ल देखील होणार लाँच. हा स्मार्टफोन दिसण्यात एस 8 आणि एस 8 प्लस सारखा असणार आहे. या स्मार्टफोनला फिंगर प्रिंट सेंसरप्रमाणे डिझाइन केलं आहे. 

या अगोदर सॅमसंगने गॅलेक्सी ए 8 आणि ए 8 प्लस लाँच केला. आता कंपनीने आपल्या आणखी एका वर्जनला सादर केलं आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात गॅलक्सी जे 7 नेक्स्ट देखील लाँच केला. या स्मार्टफोनच्या नव्या वेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. या अगोदर एप्रिल 2017 मध्ये गॅलेक्सी जे 7 नेक्स्टच्या 2 जीबी वेरिएंटला 11,490 रुपयांत लाँच केलं. 

Read More