Marathi News> टेक
Advertisement

SmartPhone Sale | भारतातील स्मार्टफोनच्या विक्रीत चीनी कंपन्यांचाच डंका

कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे स्मार्टफोनचा विक्रीत मार्च तिमाहीच्या तुलनेत जून तिमाहीमध्ये घट झाली आहे.

SmartPhone Sale | भारतातील स्मार्टफोनच्या विक्रीत चीनी कंपन्यांचाच डंका

मुंबई : भारतात स्मार्टफोन विक्री जून 2021 च्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 82 टक्क्यांनी वाढून 3.3 कोटी युनिटवर पोहचली आहे.( SmartPhone sales in India )

स्मार्टफोनच्या विक्रीत घट 
कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे स्मार्टफोनचा विक्रीत मार्च तिमाहीच्या तुलनेत जून तिमाहीमध्ये घट झाली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे स्मार्टफोन विक्रीत अंदाजित घसरणीच्या तुलनेत ही घट कमी मानली जात आहे. 

ऑनलाईन जास्त खरेदी

एप्रिल आणि मेमध्ये स्मार्टफोनची विक्री कमी झाली. ऑफलाइन ब्रँडला याचा जास्त फटका बसला. ग्राहकांनी दुसऱ्या लाटेदरम्यान ऑनलाईन प्लॅटफॉर्मला प्राथमिकता दिली.

चीनी प्रोडक्टची भागीदारी 79 टक्के
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिग्गज ब्रँड शाओमी आणि रिअलमी सारख्या ब्रँडची उच्चांकी विक्री झाली आहे. जूनच्या तिमाहीत चीनी ब्रॅडची स्मार्टफोनच्या विक्रीतील भागीदारी 79 टक्के होती. 

शाओमीची भागीदारी 28.4, सॅमसंग 17.7 टक्के, विवो 15.1 टक्के, रिअलमी 14.6 टक्के, ओप्पोची 10.4 इतकी होती.

Read More