Marathi News> टेक
Advertisement

Prime वापरकर्त्यांना झटका! Amazon वाढवणार शुल्क; जाणून घ्या नवीन किंमत

 ऍमेझॉन प्राइम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. 

Prime वापरकर्त्यांना झटका! Amazon वाढवणार शुल्क; जाणून घ्या नवीन किंमत

मुंबई : ऍमेझॉन प्राइम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. ऍमेझॉन भारतात आपली प्राइम प्रोग्रामची मेंबरशिपचे शुल्क 50 टक्क्यांनी वाढवणार आहे. हे शुल्क 1499 रुपये असण्याची शक्यता आहे. 

ऍमेझॉनने म्हटले आहे की, प्राइम मेंबरशिप वापरकर्त्यांना आम्ही प्राइम व्हिडिओ सर्विस देत असतो. तसेच लाखो वस्तूंची एका दिवसात डिलिवरी सुविधा प्रदान करतो. आता आम्ही प्राइम सेवा शुल्कात वाढ करणार आहोत.

काय आहेत नवीन दरे

ऍमेझॉनच्या प्राइम मेंबरशिपसाठी भारतीय युजर्सला वर्षाला 999 रुपयांऐवजी 1499 रुपये तीन महिन्यांसाठी 329 रुपयांऐवजी 459 रुपये आणि दर महिन्याला 129 रुपयांऐवजी 179 रुपये मोजावे लागतील.

ऍमेझॉनने म्हटले की, भारतात प्राइम मेंबरशिपची किंमत लवकरच बदलणार आहे. लवकरच यासंबधीची घोषणा करण्यात येईल.

ऍमेझॉनने म्हटले की, ''भारतात 5 वर्षाआधी लॉंच झाल्यानंतर ऍमेझॉन प्राइमच्या सदस्यसंख्येत वेगाने वाढ होत आहे. ही सेवा आणखी मुल्यवान बनवण्यासाठी आम्ही गुंतवणूक वाढवत आहोत.''

Read More