Marathi News> टेक
Advertisement

बँक अकाउंट होईल Zero! मोबाइलमधून डिलीट करा हे Apps, सरकारने दिला महत्त्वाचा अलर्ट

Screen Sharing Apps: भारत सरकारकडून वेळोवेळी सायबक क्राइमबाबत सूचना देण्यात येतात. आताही सरकारने एक अलर्ट दिला आहे.

बँक अकाउंट होईल Zero! मोबाइलमधून डिलीट करा हे Apps, सरकारने दिला महत्त्वाचा अलर्ट

Screen Sharing Apps: आजच्या डिजीटल युगात स्मार्टफोन आणि इंटरनेट आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान आहे. मात्र एकीकडे सायबर क्राइमचा धोका वाढू शकतो. भारत सरकार वेळोवेळीच सायबर क्राइमला आळा घालवण्यासाठी आव्हान करत असते. त्यानंतर अनेकदा बऱ्याचजणांकडून चुका होतात ज्याचा फायदा सायबर गुन्हेगार करतात.

अनेकदा लोक अजाणतेपणी काही अॅप्स फोनमध्ये इंस्टॉल करतात जे त्यांच्यासाठी नंतर धोकादायक ठरतात. इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने अलीकडेच एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. ज्यात लोकांना काही अॅप्स लगेचच डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर पुन्हा ते अॅप्स इन्स्टॉलकरण्याचा इशारा दिला आहे.

सरकारकडून हा इशारा स्क्रीन शेअरिंग अॅप्सबाबत देण्यात आला आहे. हे अॅप्स फोनच्या स्क्रीनला अन्य कोणत्याही डिव्हाइससोबत मिरर करतात. म्हणजेच तुम्ही या अॅपचा अॅक्सेस कोणाला दिलात तर तुमचे सगळे ओटीपी, मेसेज आणि पर्सनल डिटेल्स अन्य व्यक्तीला मिळतील. अशावेळी तुमचं बँक अकाउंटदेखील खाली करू शकतात. हे अॅप्स वापरताना बऱ्याचदा युजर्स लक्षदेता परवानगी देत असतात.

तुम्ही ALLOW बटणावर क्लिक करतात तेव्हा या अॅपच्या माध्यमातून तुमच्या फोनचा पूर्ण अॅक्सेस मिळतो. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात. त्यामुळं सरकारने हे अॅप्स तात्काळ डिलीट करण्याची सूचना केली आहे.

तसंच, सोशल मीडियावर प्रायव्हेसी सेटिंग्स मजबूत करण्याचा सल्लादेखील दिला आहे. जर तुम्ही सोशल मीडियाच्या प्रोफाइलवर पर्सनल माहिती शेअर केली असेल आणि अकाउंट पब्लिक ठेवले असेल तर कोणीही सायबर गुन्हेगार या माहितीचा चुकीचा उपयोग करु शकतो. त्यामुळं तुमच्या सोशल मीडिया अकाउंटची सेटिंग्स चेक करा आणि अनोळखी लोकांना आपली माहिती देऊ नका. यामुळं तुम्ही सायबर फ्रॉडपासून वाचू शकता

Read More