Marathi News> टेक
Advertisement

Car Safety: तुम्ही विकत घेत असलेल्या कारमध्ये ही 4 वैशिष्ट्ये नसतील, तर अजिबात घेऊ नका

आज आम्ही तुम्हाला अशा सेफ्टी फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे कारमध्ये असणे खूप महत्वाचे आहे.

Car Safety: तुम्ही विकत घेत असलेल्या कारमध्ये ही 4 वैशिष्ट्ये नसतील, तर अजिबात घेऊ नका

Every Car Must Have These Features: आपल्या दारात गाडी उभी असायला हवी, असं प्रत्येकाला वाटतं. गाडी पाहिल्याबरोबर कौतुक केलं पाहीजे, अशी इच्छा असते. त्यामुळे अनेकजण सुरक्षेपेक्षा गाडीच्या लूकवर जातात. मात्र गाडीच्या डिझाईनपेक्षा सेफ्टी फीचर्सही तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण अपघातात जीव वाचणं सर्वात महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सेफ्टी फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे कारमध्ये असणे खूप महत्वाचे आहे.

ड्युअल एअर बॅग : एक काळ असा होता की, तेव्हा कारच्या समोर एकच एअरबॅग मिळायची, मात्र आता तसं नाही. आता तुम्हाला कारमध्ये ड्युअल एअरबॅग सहज मिळू शकतात. जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर त्यामधील ड्युअल एअर बॅग्सकडे नक्कीच लक्ष द्या. जर नसेल तर आपण कार खरेदी करू नका. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हे खूप महत्वाचे आहे.

अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम : तुमच्या कारसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS खूप महत्वाची आहे. जर तुम्ही ABS असलेली कार घेतली तर सुरक्षितता वाढते. कारण ब्रेक योग्य प्रकारे लावला जातो आणि तुमचे कारवर नियंत्रण राहतं. जर तुम्ही ABS नसलेली कार खरेदी केली तर तुमची कारचा अपघात होण्यापूर्वी अडचण येऊ शकते. त्यामुळे फक्त ABS असलेली कार खरेदी करा.

स्पीड रिमाइंडर : जर तुमच्या कारला स्पीड रिमाइंडर नसेल तर अशी गाडी खरेदी करूनका. वास्तविक, हा अलार्म निश्चित वेगापेक्षा वेगवान असताना वाजू लागतो. हा स्पीड रिमाइंडर सर्व नवीन गाड्यांमध्ये दिला जात आहे. स्पीड रिमाइंडर असणे अत्यंत आवश्यक आहे.

पॅसेंजर सीटबेल्ट : जवळजवळ प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना सीटबेल्ट दिले जातात. एखाद्या गाडीत तुम्हाला प्रवासी सीट बेल्ट मिळत नसेल तर तुम्ही ती खरेदी करण्याचा विचार सोडून द्यावा. प्रवासी सीट बेल्ट कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचे काम करते.

Read More