Marathi News> टेक
Advertisement

Top 5 Mid Range Cars : सामान्य कुटुंबीयांनाही खरेदी करता येणार हक्काची कार; आता EMI ची चिंताच मिटली

Mid Range Car: तुम्ही जर या वर्षात नव्यानं कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, या कार ठरतील एक उत्तम पर्याय... पाहा....   

Top 5 Mid Range Cars : सामान्य कुटुंबीयांनाही खरेदी करता येणार हक्काची कार; आता EMI ची चिंताच मिटली

Mid Range Cars: एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी करायचं म्हटलं की अनेकदा मध्यमवर्गीय कुटुंबांकडून आर्थिक गणितांची आकडेमोड हमखास केली जाते. त्यातही मुद्दा जेव्हा कार खरेदीवर येऊन थांबतो तेव्हा आपण मोजत असणाऱ्या किमतीत कुटुंबाच्या आवडीची, पुरेशी जागा असणारी आणि चांगलं मायलेज देणारी कार खरेदी करण्यालाच अनेकजण प्राधान्य देतात. खिशाला फारशी चणचण सोसावी लागणार नाही, हा मुख्य हेतूसुद्धा अनेकदा साध्य करण्याचा प्रयत्न इथं होत असतो. अशा सर्वच अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या कार कोणत्या? पाहायचंय?  

Maruti Suzuki Alto K10

मध्यमवर्गीय कुटुंबासाठी  Alto K10 ही एक उत्तम कार.  ₹4.00 लाख ते  ₹5.96 लाख इतक्या किमतीत ही कार उपलब्ध असून, मायलेजच्या बाबतीतही ही कार अपेक्षाभंग करत नाही. 24-25 kmpl इतकं मायलेज देणारी ही कार 1.0L पेट्रोल इंजिन आणि सीएनजी वर्जनमध्येही उपलब्ध आहे. 7 इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम असणाऱ्या या कारला ड्युअल एअरबॅग्स आणि ABS फिचर्सही देण्यात आले आहेत. 

Renault Kwid

भारतातील दुसरी मिडरेंज कार म्हमजे रेनॉ क्वीड. ₹4.70 लाख ते ₹6.45 लाख इतक्या दरात उपलब्ध असणारी ही कार 21-22 kmpl इतकं मायलेज देते. 

Tata Tiago 

टाटाची ही कार भक्कम मॉडेलमुळं ओळखली जाते. Tata Tiago सुरक्षिततेच्या निकषांमध्ये सर्व अपेक्षा पूर्ण करत असून, ही कार  ₹5.60 लाख ते ₹8.20 लाखांमध्ये उपलब्ध आहे. 20-26 kmpl इतकं मायलेज देणारी ही कार पेट्रोल आणि सीएनजी वर्जनमध्येही उपलब्ध आहे. 

Maruti Suzuki S-Presso 

मायक्रो SUV च्या यादीत गणली जाणारी ही कार ₹4.25 लाख सते ₹6.10 लाख रुपये इतक्या किमतीला उपलब्ध असून ती 24-26 kmpl इतकं मायलेज देते. 1.0L पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारला हाय ग्राऊंड क्लिअरंस देण्यात आलं असून, प्रवासाचा कमाल अनुभव ही कार देते. 

Hyundai Grand i10 Nios 

प्रिमियम लूक आणि खिशाला परवडणारा दर असा पर्याय ही कार उपलब्ध करून देत असून, कारची किंमत ₹5.92 लाख ते ₹8.56 लाख रुपयांच्या घरात आहे. या कारमध्ये 20-25 kmpl मायलेजची क्षमता असून, ती सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 

Read More