Marathi News> टेक
Advertisement

उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्समुळे टोयोटाची 'ही' नवी स्वस्त एसयूव्ही ठरणार Nissan साठी आव्हान; जाणून घ्या किंमत

Toyota Fortuner SUV Price :  टोयोटाची उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्स असलेल्या या SUV ची किंमत तुम्हाला माहितीये का?

उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्समुळे टोयोटाची 'ही' नवी स्वस्त एसयूव्ही ठरणार Nissan साठी आव्हान; जाणून घ्या किंमत

Toyota Fortuner SUV Price : टोयोटा फॉर्च्युनर ही एक प्रीमियम अशी एसयूव्ही कार आहे. ती तिच्या आकर्षक डिझाइन, शक्तिशाली इंजिन आणि सर्वात सेफ्टी कार म्हणून प्रसिद्ध आहे. या एसयूव्हीची आधुनिक वैशिष्ट्ये अशी आहेत की, टच स्क्रीन इंफोटेनमेंट, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि लक्झरी इंटीरियर्स वैगरे. या गाडीची किंमत जास्त असली तरी कंपनीवर असलेल्या विश्वासामुळे लोकं या गाडीत गुंतवणूक करत आहेत. डिझेल आणि पेट्रोल इंजिन पर्यायांसह मायलेज देखील समाधानकारक असून शहरी भागात आणि ऑफ-रोड अशा दोन्ही ठिकाणी चालेल अशी प्रीमियम एसयूव्ही शोधत असाल, तर टोयोटा फॉर्च्युनर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्हीची वैशिष्ट्ये

टोयोटा फॉर्च्युनर ही एक प्रीमियम एसयूव्ही आहे जी आकर्षक डिझाइन आहे. यात एलईडी हेडलाइट्स, स्मार्ट रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, 18-इंच अलॉय व्हील आणि प्रीमियम इंटिरियर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. आतील भागात लेदर अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिक सीट्स आणि Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करणारी मोठी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. या एसयूव्हीमध्ये 7  एअरबॅग्ज, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्टॅबिलिटी कंट्रोल सारखी सेफ्टी वैशिष्ट्ये देखील आहेत. याशिवाय, यात तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कार ट्रॅक आणि लॉक/अनलॉक करू शकतात.

टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्हीचा मायलेज

ही एसयूव्ही कार डिझेल आणि पेट्रोल इंजिन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. डिझेलमध्ये मायलेज सुमारे 12-14 किमी/लिटर आहे, तर पेट्रोलमध्ये मायलेज सुमारे 10-12 किमी/लिटर आहे. हे मायलेज रस्त्याची परिस्थिती, ड्रायव्हिंगच्या स्किल्सवर अवलंबून आहे. पण फॉर्च्युनरचे मायलेज अजूनही एसयूव्हीसाठी चांगले मानले गेले आहे. याशिवाय, त्याची इंजिन पॉवर आणि तिची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता मायलेज समाधानकारक आहे.

टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्हीची किंमत

टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्हीची भारतात किंमत 35 लाख ते 50 लाख (एक्स-शोरूम) रेंजमध्ये आहे. या कारची किंमत त्याची वैशिष्ट्ये, इंजिन आणि इतर वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. ही एक प्रीमियम एसयूव्ही असून तिच्या किंमतीमध्ये चढ-उतार होऊ शकतात.

टोयोटा फॉर्च्युनर इंजिन

टोयोटा फॉर्च्युनर 2.7-लीटर पेट्रोल इंजिन आणि 2.8-लीटर डिझेल इंजिनच्या पर्यायांसह ऑफर करण्यात आली आहे. पेट्रोल इंजिन 164 bhp आणि 245 Nm टॉर्क निर्माण करते, तर डिझेल इंजिन 201 bhp आणि 500 ​​Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येतात. फॉर्च्युनरमध्ये 4×4 ड्राइव्ह सिस्टीम देखील आहे, जी ते ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी योग्य बनवते. या एसयूव्हीचे इंजिन शक्तिशाली आणि गुळगुळीत आहे, जे हायवे ड्रायव्हिंग आणि कठीण रस्त्यांवर उत्कृष्ट कामगिरी देते.

Read More