अक्षय घुगे, झी मीडिया, मुंबई : TVS ने बाईक्सचे दोन नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. अनेक अंगाने या बाईक्स वैशिष्ट्येपूर्ण आहेत. आपल्या जुन्या बाईक मॉडेल्सशी तुलना केली कर सर्वात प्रथम सुरुवात करु लुक्सने. सर्वात आधी आपली नजर जाईल ती हेडलॅम्पवर. टीव्हीएसच्या डिझाईनिंग टीमने त्याच्या आकर्षकतेसाठी प्रयत्न केले आहेत. या दोन्ही बाईक्समध्ये १२ लीटरची इंधन टाकी आहे. त्याच्या खाली छान अशी कट लाईन डिझाईन केली आहे. त्याचबरोबर इंजिनाच्या खाली असलेलं मडगार्डही बाईकचा बोल्ड लुक कायम ठेवतं आहे.
बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपीक फोर्क आणि मोनोशॉक सस्पेन्शन मिळतंय. बाईकला 17 इंचाचे टाय़र आहेत. जे पकडच्या बाबतीत खूप चांगले आहेत. या रेसिंग ट्रॅकवर 160 4V चालवण्याची मजा काही औरच...160 4V आता 16 BHP ची पॉवर आणि 14.12 NM चं टॉर्क प्रोड्यूस करते. ही बाईक चालवताना आपल्याला परफॉर्मन्समध्ये काहीही कमतरता जाणवत नाही. आणखी काही गोष्टींची स्तुती जरुर करावी लागेल ती म्हणजे सस्पेन्शनची. टर्निंगच्या वेळेलाही तुम्हाला जास्त आरामदायी वाटू शकतं. त्याचबरोबर पुढच्या बाजुला 270 MM आणि रिअर मध्ये 200 MM चे डिस्क ब्रेक दिले आहेत. ज्यामुळे प्रभावी पकड येते. कंपनीने या दोन्ही बाईक्समध्ये नवीन लो-स्पीड रायडींग दिलं आहे. या बाईकचं वजन 200 किलो आहे.
160 च्या तुलनेत याचा हँडेल बार वेगळा आहे. लूक बरोबरच राईडच्या वेळी एक स्पोर्टी फिल येतो. या बाईकमध्येही 17 इंचाचे ट्युबलेस टायर आहेत. 2020 अपाचे सीरीज मध्ये TVS चं RT-Fi फ्यूल इंजेक्शन सिस्टम दिलं आहे. 200 आता 20bhp ची पॉवर आणि 16.8Nm चं पीक टॉर्क प्रोड्युस करते. 5 स्पीड गिअरसह स्लिपर क्लच या बाईकमध्ये आहे.
वैशिष्ट्ये तुम्हाला आवडली असतील पण जर बाईकची किंमत जास्त वाटत असेल. पण एक गोष्ट आपण विसरता कामा नये. या बाईक्समध्ये BS - 6 इंजिन बसवलं आहे. यावरुन या बाईक्सचं महत्व लक्षात येतं.
TVS बाईक्सचे दोन नवीन मॉडेल लॉन्च
Updated: Jan 05, 2020, 06:48 PM IST
TVS च्या २ नव्या बाईक्स बाजारात

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.