Marathi News> युथ क्लब
Advertisement

'व्हॅलेंटाईन डे' आधी हे आहेत 'प्रेमाचे विशेष ८ दिवस'

 भारतात या दिवसांना तसं कुणी जास्त मानत नाही. पण रोझ डे आणि व्हॅलेटाईन डे तेवढा मात्र तरूणांच्या लक्षात राहतो.

'व्हॅलेंटाईन डे' आधी हे आहेत 'प्रेमाचे विशेष ८ दिवस'

मुंबई : व्हॅलेंटाईन डेजचा हा आठवडा सुरू आहे, तुम्हाला माहित आहे का? की ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत नेमके कोणकोणते दिवस आहेत. भारतात या दिवसांना तसं कुणी जास्त मानत नाही. रोझ डे आणि व्हॅलेटाईन डे तेवढा मात्र तरूणांच्या लक्षात राहतो.

पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण...पण

हे जरी पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण असलं, तरी नवीन नवीन का असेना?, काही तरूण मंडळी मात्र हे सेलिब्रेट करण्यात मुश्गुल असतात हे नक्की.

व्हेलेंटाईन डेजचा आठवडा

०७ फेब्रुवारी २०१८ : रोझ डे
०८ फेब्रुवारी २०१८ : प्रपोझ डे
०९ फेब्रुवारी २०१८ : चॉकलेट डे
१० फेब्रुवारी २०१८ : टेडी डे
११ फेब्रुवारी २०१८ : प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी २०१८ : हग डे
१३ फेब्रुवारी २०१८ : किस डे
१४ फेब्रुवारी २०१८ : व्हॅलेंटाईन डे

गुलाबाला मोठी मागणी

रोझ डे साजरा होण्याचं प्रमाण वाढलं आहे, यामुळे गुलाब पुष्प शेतीलाही या काळात चांगले दिवस असतात, परदेशातही गुलाबाला मोठी मागणी असते.

मात्र आता व्हॅलेंटाईननंतर या व्हॅलेन्टाईन आठवड्यात हे आठ दिवस आणखी रंगत आणताना दिसत आहेत. रोजचं नवनवीन विशेष दिवसाच्या शुभेच्छा यात अधिक रंगत आणत आहेत.

 

Read More