Vivo 5G Smartphone: तंत्रज्ञानामुळे जगात इतके बदल होत आहे की, सांगायला नको. एका पेक्षा एक सरस असे गॅझेट्स लाँच होत आहेत. त्यामुळे भविष्यात काय तंत्रज्ञान विकसित होईल, याचा काही नेम नाही. तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमध्येही वेगाने बदल होत आहेत. आता मोबाईलप्रेमींमध्ये Vivo च्या जबरदस्त फीचर्स आणि स्टायलिश डिझाईन असलेल्या स्मार्टफोनची चर्चा आहे. कारण हा फोन साधासुधा नसून सरड्यासारखा रंग बदलणारा आहे, असं बोललं जात आहे. Vivo लवकरच भारतात V25 सीरिज लाँच करणार आहे. यात V25 आणि V25 Pro व्हेरियंटचा समावेश असेल. कंपनीने अधिकृत वेबसाईटवर येणाऱ्या गॅझेट्सची एक मायक्रोसाइट टाकली आहे. विवो V23 सीरिजच्या बदल्यात ही सीरिज लाँच होणार आहे. ही सीरिज कंपनीने या वर्षाच्या सुरवातीला सुरु केली होती. लीक नुसार, विवो 17 ऑगस्ट रोजी भारतात V25 सीरिजचं लाँचिंग करेल, अशी आशा आहे.
Vivo V25 सीरिज स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनच्या वेबसाईटवर विवो वी25 सीरिजच्या लँडिंग पेजवर प्रो व्हेरियंटच्या स्पेसिफिकेशनची माहिती मिळते. यात थ्री डी कव्हर्ड स्क्रिन आणि 120 एचझेड रिफ्रेश रेटसह सेंटर अलाइन्ड पंच होल कटआउट सुविदा असेल. खास म्हणजे हा फोन कॅमेरा मॉड्यूल आणि एका रंग बदलणाऱ्या बॅक पॅनल तंत्रज्ञानासह येईल.
Are you ready for the delight coming your way?
— Vivo India (@Vivo_India) August 8, 2022
Stay tuned for vivo V25 Pro, the magical colour changing phone.
Know More: https://t.co/MXzJtFOeLR#vivoV25Pro #MagicalPhone #V25Series #DelightEveryMoment pic.twitter.com/8TPXQvJu9F
Vivo V25 सीरिज कॅमेरा
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे. तसेच OIS सपोर्टसह 64 एमपी मुख्य सेंसर असणार आहे. यात हायब्रिड इमेज स्टेबिलायजेशन, सुपर नाईट मोड, बोकेह फ्लेयर पोर्टेट यासारखे फीचर्स असतील.
Vivo V25 बॅटरी
हुड अंतर्गत Vivo V25 Pro हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंशन 1300 प्रोसेसर असेल. यात 8 जीबी एक्सपांडेबल वर्च्युअल रॅम तंत्रज्ञान असेल. स्मार्टफोन 66W फास्ट चार्जिंगसह 4830 mAh बॅटरी असेल.