Marathi News> टेक
Advertisement

JIO ला टक्कर देण्यासाठी Vodafone चा सर्वात स्वस्त जबदस्त प्लान लॉन्च

या नवीन प्लाननुसार ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटा आणि sms या सुविधा मिळणार आहे. 

JIO ला टक्कर देण्यासाठी Vodafone चा सर्वात स्वस्त जबदस्त प्लान लॉन्च

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने सर्वात स्वस्त प्लान लॉन्च केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा दर युद्ध सुरु होण्याचे संकेत मिळत आहे. व्होडाफोनचा ४७ रुपयांचा नवा प्लान आहे. यात मोफत कॉल, डेटा आणि एसएमएस मिळणार आहे. ४७ रुपयांच्या या पॅकची मुदत २८ दिवसांची आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ४७ रुपयांच्या या पॅकमध्ये १२५ मिनिटे मोफत कॉलिंग मिळेल. यात लोकल आणि एसटीडी आणि रोमिंक कॉल करु शकता. त्यासोबत २८ दिवसांसाठी ५०० एमबी २ जी, ३ जी आणि ४ जी  डेटा मिळेल. या प्लानमध्ये ५० एसएमएस तुम्ही करु शकता. हा प्लान हा तुमच्या मोबाईल बॅलन्समधून वापरता येणार आहे. तसेच तो  बॅलन्सच्या माध्यमातून अॅक्टीव्ह करता येऊ शकतो.

जिओचा ४९ रुपयांचा प्लान आहे. त्यानुसार तुम्हाला १ जीबी डेटा मिळता. तसेच या प्लानची मुदत २८ दिवसांची आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि ५० एसएमएस ऑफर आहे. त्यासोबत जिओ टीव्ही आणि जिओ म्युझिक अॅप फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

Read More