Marathi News> टेक
Advertisement

Vodafone ने लॉन्च केला २२९ चा जबरदस्त प्लान, रोज २ जीबी डेटा आणि या सुविधा

व्होडाफोनने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक चांगली योजना सुरू केली आहे.  

Vodafone ने लॉन्च केला २२९ चा जबरदस्त प्लान,  रोज २ जीबी डेटा आणि या सुविधा

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. जिओमुळे, सर्व कंपन्यांना सतत नवीन योजना सुरु कराव्या लागत आहेत. तसेच जुन्या योजना नव्याने लॉन्च केल्या जात आहेत. आता व्होडाफोनने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक चांगली योजना सुरू केली आहे. २२९ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. यात २ जीबी ४ जी / ३ जी डेटा मिळतो. योजनेची वैधता २८ दिवस आहे. 

या योजनेमध्ये स्थानिक, एसटीडी आणि २८ दिवसांच्या रोमिंग अमर्यादित कॉलिंगची सुविधा असणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस विनामूल्य आहे. याशिवाय, व्होडाफोन प्ले स्टोअर थेट टीव्ही, मूव्हीचा २८ दिवसांचा फायदा घेऊ शकतात. व्होडाफोन प्ले अॅप डाऊनलोड करण्यासाठी टाइप करा प्ले आणि १९९ वर पाठवा.

व्होडाफोनचा १९९ रुपयांचा एक प्लान आहे. ज्या २२९ रुपयांच्या प्लानमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा या योजनेत उपलब्ध आहेत. परंतु दररोज फक्त १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. तसेच, माय व्होडाफोन अॅपद्वारे १९९ रुपये रिचार्ज केले तर १००% कॅशबॅक मिळेल.

Read More