Marathi News> टेक
Advertisement

प्रीपेड ग्राहकांसाठी व्होडाफोनची धमाकेदार ऑफर !

 ही ऑफर अगदी खास असून प्रीपेड ग्राहकांना यामधून मोठा लाभ मिळणार आहे. 

  प्रीपेड ग्राहकांसाठी व्होडाफोनची धमाकेदार ऑफर !

नवी दिल्ली: दुरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफरचे लॉन्चिंग करत आहेत. रिलायन्स जिओ बाजारात दाखल झाल्यापासून अनेक कंपन्याना कुलुप लागले आहेत. तसेच काही नामंकीत कपन्या रिलायन्स जिओला टक्कर देताना दिसत आहेत. यासाठीच व्होडाफोन कंपनी त्यांची धमाकेदार ऑफर घेउन येत आहे. ही ऑफर अगदी खास असून प्रीपेड ग्राहकांना यामधून मोठा लाभ मिळणार आहे. 

व्होडाफोन कंपनीने त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी ९९९ रुपयाचे ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल+एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग यांसारखी सुविधा देण्यात आली आहे. यासोबत ग्राहकांना १२ जीबी डेटा आणि प्रतिदिन १०० एसएमएस मिळणार आहेत. तसेच या ऑफरची कालावधी ३६५ दिवसांचा असणार आहे. मात्र ही ऑफर केवळ पंजाब सर्कलसाठी उपलब्ध करण्यात आली आहे, असे कंपनीने सांगितले आहे. याआधी व्होडाफोन कंपनीने १६९९ रुपयांचे प्लॉन लॉन्च केले होते. याचा कालावधी 365 दिवसांचा असून प्रतिदिन १ जीबी ४जी डेटा देण्यात आला आहे.  

Read More