Marathi News> टेक
Advertisement

व्होडाफोनची बंपर ऑफर, इंटरनेट-अनलिमिटेड कॉलिंग..किंमत फक्त...

नवीन वर्षाच्याआधी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे.

व्होडाफोनची बंपर ऑफर, इंटरनेट-अनलिमिटेड कॉलिंग..किंमत फक्त...

मुंबई : नवीन वर्षाच्याआधी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे. १९८ रुपयांमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड प्लान देण्यात येणार आहे. या प्लाननुसार व्होडाफोन ग्राहकांना अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉल, रोज एक जीबी इंटरनेट डेटा, रोज १०० एसएमएस आणि फुकटात रोमिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांसाठी असणार आहे. नव्या ग्राहकांसाठी हा प्लान २२९ रुपयांना मिळणार आहे.

जिओनंही आणला नवा प्लान

याआधी रिलायन्स जिओनंही नवीन वर्षासाठी दोन नवे प्लान्स लॉन्च केले आहेत. ‘हॅप्पी न्यू ईयर 2018 प्लान’मध्ये जिओच्या प्राईम ग्राहकांना १९९ रुपयांमध्ये दिवसाला १.२जीबी ४जी डेटा २८ दिवसांसाठी मिळणार आहे. तर २९९ रुपयांमध्ये दिवसाला २जीबी ४जी इंटरनेट डेटा मिळेल. या प्लानची व्हॅलिडिटीही २८ दिवस असणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जिओचे अॅप, व्हॉईस कलिंग आणि एसएमएस फुकट आहेत. 

Read More