Marathi News> टेक
Advertisement

Walmart कडून १ लाख कोटी रूपयात Flipkart ची खरेदी

 जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट आणि भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये डील फायनल झाली आहे.

Walmart कडून १ लाख कोटी रूपयात Flipkart ची खरेदी

मुंबई : जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट आणि भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये डील फायनल झाली आहे. वॉलमार्ट 1.07 लाख कोटी रूपयात ७७ टक्के शेअर्स खरेदी करणार आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, वॉलमार्टने याला दुजोरा दिला आहे. याआधी पहिल्यांदा फ्लिपकार्टची शेअरधारक कंपनी, जपान सॉफ्ट बँक ग्रुपचे सीईओ मासायोशी सोन यांनी म्हटलं होतं की, रात्री डील फायनल झाली.या डीलमुळे फ्लिपकार्टने २३०० कोटी रूपयांचे शेअर्स बायबॅक केले आहेत, फ्लिपकार्टने आपल्या सिंगापूरच्या पेरेंट कंपनीत २३०० रूपयांचे शेअर्स पुन्हा खरेदी केले. फ्लिपकार्टने स्वत:ला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्यासाठी असं केलं आहे.

फ्लिपकार्ट प्रमुख कल्याण कृष्णमूर्ती आणि फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बंसल सध्या कंपनीत कायम राहतील. सह-संस्थापक सचिन बंसल हे सोडणार असल्याची चर्चा आहे. भारतीय ऑनलाइन बाज़ारात याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. सध्या भारताचा ४० टक्के ऑनलाईन बाजार प्लिपकार्टच्या नियंत्रणाखाली आहे. 

Read More