Marathi News> टेक
Advertisement

एकाचवेळी 32 लोकांना व्हिडीओ कॉल, 1024 जणांचा ग्रुप... व्हॉट्सअपचं नवं फिचर्स पाहिलंत का?

तुम्ही WhatsApp वर ग्रुप व्हिडिओ कॉल करत असाल किंवा तुम्ही ग्रुप अॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

एकाचवेळी 32 लोकांना व्हिडीओ कॉल, 1024 जणांचा ग्रुप... व्हॉट्सअपचं नवं फिचर्स पाहिलंत का?

Tech News : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) व्हिडीओ कॉल (Video Call) करण्याचे शौकिन असाल किंवा ग्रुप ऍडमिन (Group Admin) असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडीओ कॉल आणि ग्रुपसाठी काही नवीन फिचर्स ऍड करण्यात आलीयेत. व्हॉट्सअॅपमध्ये कोणती नवीन फिचर्स ऍड करण्यात आलीयेत पाहुयात

नवी फिचर्स कोणती? 

32 लोकांना एकाचवेळी व्हिडीओ कॉल करता येणार

ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स अॅड करता येऊ शकतात

ग्रुपमध्ये 'कम्युनिटी पोल' टाकून प्रश्न विचारता येणार

2GB पर्यंतची फाईल शेअर करता येणार

नवीन इमोजीस, अॅडमीन डिलीट फिचरची भर

चॅटच्या सर्वात वर कम्युनिटी चॅट ऑप्शनमधून ही फिचर्स ऍक्टिव्हेट करता येतील

यापूर्वी पेमेंट फिचर वॉट्सऍपमध्ये ऍड करण्यात आलं होतं. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसला नाही. दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्मशी स्पर्धा तीव्र होतेय आणि त्याच पार्श्वभूमीवर व्हॉट्सऍपमध्ये नवीन फिचर्स अॅड करण्यात आलेत, आता युसर्ज या फिचर्सना कसा प्रतिसाद देतात, हे पाहावं लागेल.

Read More