Marathi News> टेक
Advertisement

आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर पर्सनल मेसेज पाठवण्याची सुविधा...

मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे.

आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर पर्सनल मेसेज पाठवण्याची सुविधा...

सेन्ट फ्रांसिस्को : मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे. या अपडेटमुळे ग्रुप मधील सदस्याला पर्सनल मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या सदस्याला वेगळा पर्सनल मेसेज पाठवण्याची गरज नाही. तुम्ही ग्रुपमध्येच तुम्ही सदस्याला पर्सनल मेसेज पाठवू शकता.

नवीन अपडेट

व्हाट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये आलेल्या नवीन बदलामुळे ग्रुपचा सदस्य त्या पर्सनल मेसेजला उत्तरही देऊ शकेल. पूर्वी तुम्ही केलेला मेसेज ग्रुपमधील सर्व सदस्य वाचू शकत होते. त्यामुळे पर्सनल मेसेज करण्यासाठी ग्रुप बाहेर पडून पर्सनल चॅटवर जावून तुम्हाला मेसेज करावा लागत होता.

तुमचे काम होणार सोपे

मात्र या नवीन अपडेटमुळे तुमचा हा त्रास वाचणार आहे. त्याचबरोबर व्हाट्सअॅप आता लवकरच बिझनेस ग्रुपसाठी विशेष अॅप बनवणार आहे. यात ग्रुप कॉलिंगची सुविधाही मिळेल. 

Read More