Marathi News> टेक
Advertisement

व्हॉट्सअॅप लवकरच आणणार 'हे' नवे फिचर...

आपल्या युजर्सच्या अपेक्षा लक्षात घेऊन व्हॉट्स अॅप सातत्याने नवनवे फिचर्स, सुविधा घेऊन येत आहे.

व्हॉट्सअॅप लवकरच आणणार 'हे' नवे फिचर...

नवी दिल्ली : आपल्या युजर्सच्या अपेक्षा लक्षात घेऊन व्हॉट्स अॅप सातत्याने नवनवे फिचर्स, सुविधा घेऊन येत आहे.

हे आहे नवीन फिचर

आता ग्रूप व्हिडिओ कॉलिंग हे फिचर युजर्सच्या सुविधेसाठी लॉन्च होणार आहे. त्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आता सध्या ग्रूप व्हिडिओ कॉलिंग फिचरची चाचणी सुरू आहे. सुरूवातीला हे फिचर अॅनरॉईड फोनवर उपलब्ध होणार असल्याची माहिती बीटा इन्फोने दिली आहे. मात्र नक्की कधीपर्यंत हे फिचर युजर्ससाठी उपलब्ध होईल, हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. पण या फिचरच्या माध्यमातून चारजण एकत्र बोलू शकतील.

व्हिडिओ कॉलिंगचं फिचर

गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचं फिचर सुरू केलं होतं. तेव्हापासूनच ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मागणी होत होती. आता या व्हिडिओ कॉलिंगचं फिचरमध्ये Add Personचा पर्याय देण्यात आला आहे. 

Read More