Marathi News> टेक
Advertisement

Xiaomi 13 Ultra : फोन आहे की DSLR कॅमेरा? सॅमसंगच्या Galaxy S23 Ultra ला टक्कर देणार Xiaomi 13 Ultra

Xiaomi 13 Ultra : Xiaomi 13 Ultra फोन हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होणार आहे. 18 एप्रिल रोजी चिनी बाजार हा फोन लाँच होणार आहे. शोओमीने या फोनचे फोटो शेअर केले आहेत. Xiaomi 12S Ultra या फोनचे Xiaomi 13 Ultra  हे अपडेट व्हर्जन आहे. 

Xiaomi 13 Ultra : फोन आहे की DSLR कॅमेरा? सॅमसंगच्या  Galaxy S23 Ultra ला टक्कर देणार Xiaomi 13 Ultra

Xiaomi 13 Ultra  Vs Galaxy S23 Ultra : सॅमसंगच्या  Galaxy S23 Ultra या फोनने सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. या फोनला टक्कर देण्यासाठी शोओमी कंपनी देखील आपला तगडा फोन बाजारात उतरवणार आहे. Xiaomi 13 Ultra  हा फोन  सॅमसंग Galaxy S23 Ultra फोनला पर्याय  म्हणून उतरवणार आहे. या फोनचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे. या फोनच्या कॅमेऱ्याला प्रोशनल लेन्स असणार आहे. या फोनचे लेन्स पाहून हा  फोन आहे की DSLR कॅमेरा असा प्रश्न अनेक जण उस्थित करत आहेत. 

Xiaomi 13 Ultra फोन हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होणार आहे. 18 एप्रिल रोजी चिनी बाजार हा फोन लाँच होणार आहे. शोओमीने या फोनचे फोटो शेअर केले आहेत. Xiaomi 12S Ultra या फोनचे Xiaomi 13 Ultra  हे अपडेट व्हर्जन आहे. 

Leica कॅमेरा सेंसर लेन्स हे या फोनचे खास फिचर आहे. Xiaomi चे CEO Lei Jun यांनी Xiaomi 13 Ultra चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  Xiaomi 13 Ultra हा फोन फोटोग्राफीसाठी बेस्ट फोन ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये  Leica कॅमेरा लेंस आहेत. या फोनचा लुक देखील DSLR कॅमेऱ्यासारखा आहे. या फोनचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चीन मद्ये लाँच झाल्यानंतर हा फोन भारतीय बाजारपठेत कधी उपलब्ध होईल? तसेच याची किंमत किती असेल? कोणत्या व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. 

Xiaomi 13 Ultra चे बेस्ट फिचर्स

  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर 
  • क्वाड रियर कैमरा सेटअप
  • 50MP कॅमेरा
  • चार वाईड एन्गल आणि अल्ट्रा वाईड एन्गल लेन्स
  • 6.7 इंची WQHD+ AMOLED LTPO डिस्प्ले
  • 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट 
  • 32MP सेल्फी कॅमेरा
Read More